पाच महिन्याच्या गर्भवतीने ६२ मिनिटांत केली १० किलोमीटरची शर्यत पूर्ण

0

 

गर्भवती महिलांना सगळेच जण काळजी घ्यायला लावतात. सावकाश चालायचं, धावपळ करायची नाही, काळजी घ्यायची असे अनेकदा आपण गर्भावती महिलांना डॉक्टर किंवा कुटुंबिय सांगताना पाहिले असेल.

आज आपण एका अशा महिलेची गोष्ट जाणून घेणार आहोत, जिने गर्भवती असून धावण्याचा विश्वविक्रम केला आहे. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव अंकिता गौर असे आहे.

५ महिन्यांची गर्भवती असणाऱ्या अंकिताने १० किलोमीटरचे अंतर धावत पार केले आहे, या शर्यती धावून तिने विश्वविक्रम केला आहे. तिच्या विक्रमामुळे देशभरात तिचे कौतुक केले जात आहे.

अंकीता यांना टीसीएस वर्ल्ड १० के स्पर्धेत ६३ मिनिटांत १० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. गेल्या ९ वर्षांपासून ती धावण्याचा सराव करते. ऍक्टीव्हीटी करणे, तिच्यासाठी श्वास घेण्याप्रमाणे असल्याचे अंकीताने सांगितले आहे.

धावणे हि एक अशी गोष्ट जी मी गेल्या नऊ वर्षांपासून दररोज करत आहे. बऱ्याचदा लोक आजारी असल्यास, जखमी असल्यास व्यायाम करत नाही. पण मी असे कधीच केले नाही, मी धावण्याचा सराव रोज करते, असेही अंकीताने म्हटले आहे.

या स्पर्धेची तयारी करण्यासाठी मी रोज ५ ते ८ किलोमीटर हळुहळू धावत होती. जेव्हा या शर्यतीत मी धावत होती तेव्हा मी ब्रेक पण घेत होती. कारण मी पाच महिन्याची गर्भवती असल्याने माझ्या आधीच्या शरीरात आणि आताच्या शरीरात बदल झाला आहे, असे अंकीताने म्हटले आहे.

अंकीता गौर एक इंजिनियर आहे. अंकीता २०१३ वर्षांपासून दरवर्षी टीसीएस वर्ल्ड १० के या स्पर्धेत भाग घेत आहे. अंकीताने आतापर्यंत वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतलेला आहे. बर्लिन, बॉस्टन, नियॉर्क या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत पण अंकीताने भाग घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.