कौतुकास्पद! परभणीची अंजली जगभरातील ६० महिलांमध्ये आली अव्वल; ठरली मिसेस एशिया युनिव्हर्स

0

 

असे म्हणतात जगात जर्मनी अन् भारतात परभणी, आता पून्हा एकादा हे दिसून आले आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात जन्मलेली महिला मिसेस एशिया युनिव्हर्सची मानकरी ठरली आहे.

या महिलेचे नाव अंजली संपत कोला-पोर्जे असे आहे. अंजलीने राजस्थानमध्ये जयपूर येथे झालेल्या मिसेस युनिव्हर्स प्रा. लि. तर्फे घेण्यात आलेल्या ब्युटी पिजंट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पाचव्या श्रेणीत जगभरातून आलेल्या ६० विवाहित महिलांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे तिला मिसेस एशिया युनिव्हर्स २०२१ चा किताब मिळाला आहे.

अंजली जिंतूर शहराच्या एक सामान्य कटुंबातून येते.  तिला लहानपणापासून फॅशन डिझायनिंगची आवड होती. अंजलीचे शालेय शिक्षण एकलव्य बालविद्यामंदिरामध्ये झाले होते, तर उच्चमाध्यमिक शिक्षणासाठी ती औरंगाबादला होती.

त्याकाळात तिने आपला मॉडेलिंग आणि फॅशन डिझायनिंगचा छंद जोपासला होता. विशेष म्हणजे तिला लग्नानंतर देखील आपल्या छंदाला जोपासता आले.

२००९ मध्ये औरंगाबादमधील इलेक्ट्रिकल इंजिनिअर संपत पोर्जे  या तरुणाशी तिचा विवाह झाला होता. लग्नानंतर आपला छंद जोपासता येईल का? अशी शंका तिच्या मनात होती, पण आपल्या पत्नीच्या स्वप्नांना बळ देत फॅशन डिझायनिंगचा छंद जोपासण्यासाठी संपत यांनी स्वत: प्रोत्साहन दिले.

अंजली यांनी वयाच्या २१ वर्षांपासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. त्यांनी आतापर्यंत मुंबई, पुणे, दिल्ली, औरंगाबाद, नाशिक अशा ठिकाणी ५० पेक्षा जास्त ब्युटी पिजंट स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून आपली भूमिका बजावली आहे.

मिसेस एशिया युनिव्हर्सचा किताब जिंकण्यासाठी अंजली यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते, या स्पर्धेत मिसेस युनिव्हर्सच्या पाचव्या श्रेणीत जगभरातल्या ६० महिलांनी सहभाग नोंदवला होता.

पुढे या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी ५ महिलांची निवड करण्यात आली होती. या पाच महिलांमधून अंजली यांनी मिसेस युनिव्हर्स २०२१ चा किताब मिळवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.