बेड सिस्टीमची शेती करून हा तरुण करतोय बक्कळ कमाई, वाचा काय आहे बेड सिस्टीम

0

 

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे, त्यामुळे अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि तर काहींनी गावी जाऊन शेती करण्यास सुरुवात केली आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली आणि तो गावाला गेला. तिथे जाऊन त्याने शेती करण्यास सुरुवात केली असून तो शेतीतून दिवसाला हजारो रुपयांची कमाई आहे. इतकेच नाही तर त्याने आता गावात स्वतःची एक नवीन ओळख सुद्धा बनवली आहे.

कनेलमध्ये राहणाऱ्या या तरुणाचे नाव अनिल त्रिपाठी असे आहे. अनिल यांनी बीएड पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. सहा वर्षे नोकरी शोधली पण त्यांना नोकरी भेटत नाही.

जेव्हा अनिल यांना नोकरी मिळाली तेव्हा २०१५ मध्ये ते लुधियानाला गेला. त्यांनी काही वर्षे काम केले आणि मार्चमध्ये लॉकडाऊन पडला. त्यामुळे त्यांना गावी यावे लागले.

नोकरी करत असताना ते पंजाब, अंबाला, छत्तीसगड, अशा वेगवेगळ्या राज्यात फिरून आले होते, तिथल्या शेतकऱ्यांना त्यांनी अनोख्या पद्धतीने शेती करताना पाहिले होते. अनिल यांना तशाच प्रकारची शेती करायची होती.

अनिल यांनी १ एकर जमिनीत बेड सिस्टीमने शेती सुरू केली. त्यांनी त्या जमिनीत दोन फुटांच्या अंतरावर बेडसारखी मातीची रचना केली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड केली.

मुळा, गाजर, कोथिंबीर, टोमॅटो, वांगे, पालक, बीटरूट, मिरची, लसूण, कांदा, कारले, काकडी यांची लागवड अनिल यांनी त्या शेतात केली. त्यांच्या प्रयोगामुळे त्यांना रोज वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न मिळते. ही शेती करून अनिल हे रोज हजारो रुपयांची कमाई करत आहे.

बेड सिस्टीम शेती ही एक आधुनिक पद्धतीची शेती आहे. ही शेती करताना शेतात प्रत्येक दोन फुटांच्या अंतरावर मातीची बेडसारखी रचना केली जाते. कापणी करताना एक-एक बेडनुसार केली जाते, त्यामुळे रोज उत्पन्न मिळण्यास मदत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.