शिक्षकाची नोकरी सोडली, आता घराच्या भिंतीवर नर्सरी करुन ६ महिन्यात कमवले ३ लाख

0

 

असे म्हणतात शेती करायची असेल तर कमीत कमी दोन तीन एकर जमीन पाहिजे. अशात काही शेतकरी गुठ्यांमध्ये शेती करुन लाखोंची कमाई करत आहे, पण आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत ज्याच्याकडे स्वत:ची जमिन नसतानाही तो शेती करुन लाखोंची कमाई करत आहे.

राजस्थानच्या जयपुरमध्ये राहणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचे नाव अनिल थडानी असे आहे. अनिल हे २५ वर्षांचे आहे. त्यांच्या घरात कुणीही शेती करत नव्हते, तसेच त्यांच्याकडे शेती करण्यासाठी जमिनही नव्हती, तरी ते आता एक यशस्वी शेतकरी आहे.

अनिल यांनी त्यांनी नर्सरीचा व्यवयास सुरु केला असून सध्या त्यांच्याकडे पाच हजार पेक्षा जास्त फुलांचे आणि भाज्यांचे रोपटे आहे. तसेच त्यांनी आतापर्यंत दोन हजार शेतकऱ्यांना याचे प्रशिक्षण दिले आहे.

स्वता: कडे जमीन नसल्याने त्यांनी आतापर्यंत ५० पेक्षा जास्त घरांच्या गार्डनचे रुपांतर त्यांनी नर्सरीमध्ये केले आहे. तसेच १०० पेक्षा जास्त लोक त्यांचे रोजचे ग्राहक आहे, ज्यांना ते रोज भाजी आणि फुले विकतात. अनिल यांनी या व्यवसायातून ६ महिन्यांपेक्षा कमी वेळात ३ लाख रुपयांची कमाई केली आहे.

अनिल यांचे वडिल गौशाळेत काम करत आहे. तर अनिल यांची आई एक गृहीणी आहे. अनिल यांचे शिक्षण जयपुरमध्येच झाले आहे. त्यानंतर त्यांनी अजमेरमधून ऍग्रीकल्चरचे शिक्षण घेतले. पुढे त्यांना एका कॉलेजमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली.

अशात जेव्हा तो शिक्षण घेत होता, तेव्हा त्याचे खुप मित्र शेतकरी कुटुंबातील होते. त्यामुळे ते नेहमीच शेतीच्या चर्चा करत असायचे. त्यामुळे त्यांचे शेती विषयीचे आकर्षण वाढले होते. नोकरी करत असतानाही त्यांना शेती करायची इच्छा होत होती, त्यामुळे त्यांनी शेती करण्यासाठी नोकरी सोडली.

२०१८ मध्ये त्यांनी नोकरीसोबतच शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या शेतात काम करण्यास सुरुवात केली, ज्यांच्याकडे स्वत:ची शेती केली आहे. २०२० मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि नर्सरी करण्यास सुरुवात केली.

त्यांच्याकडे नव्हती, त्यामुळे त्यांनी घराच्या छतावर भिंतींवर नर्सरीची सुरुवात केली. या नर्सरीमध्ये रोपटे एका विशिष्ट प्रकारचे बॅगमध्ये ठेवले जाते, त्यामध्ये खत आणि मातीही टाकली जाते. या बॅगमुळे त्यांची वाढ चांगली होते. या शेतीतून त्यांची चांगलीच कमाई होत आहे.

या नर्सरीसाठी तुमच्याकडे जागा जास्त असेल तर तुम्ही गाजर आणि बटाट्याची लागवड करु शकतात. अशा प्रकारची शेती तुम्ही ३ ते ५ हजार रुपयांमध्येही सुरु करु शकतात. शेतीसाठी तुमच्याकडे जर जमीन नसेल तर हा तुमच्याकडे एक उत्तम पर्याय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.