फौजदार बापाने डीएसपी मुलीला केला सलाम! पुढे मुलीने जे केले ते बघून तुम्हाला पण कौतुक वाटेल…

0

 

आई वडिलांचे नेहमीच स्वप्न असते आपला मुलगा किंवा मुलगी मोठे होऊन अधिकारी बनावे. त्यासाठी नेहमीच ते कष्ट घेताना दिसून येतात. जेव्हा मुलंमुली आपली आई वडिलांची इच्छा पूर्ण करता, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नाही. असाच काहीसा प्रसंग आंध्रप्रदेशमध्ये बघायला मिळाला आहे.

आंध्रप्रदेशातील तिरुपती इथल्या राज्यातील पोलिसांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला. तेव्हा तिरुपती इथल्या सर्कल इन्स्पेक्टर वाय श्याम सुंदर यांनी त्यांची मुलगी वाय जेस्सी प्रसांथीला सॅल्युट केला आहे.

मुलगी डिएसपी असल्याने पित्याने आपल्या मुलीला सॅल्युट केला आहे. त्यावेळी त्या दोघांसह भावनिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्वच पोलिसांचे डोळे पाणावले होते. या भावनिक क्षणाचा फोटो आंध्र प्रदेश पोलिस विभागाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

आपल्या मुलीला सॅल्युट करतानाचा हा क्षण सर्कल इन्स्पेक्टर श्याम सुंदर यांच्यासाठी मोठा अभिमानाचा असल्याचा त्यांनी सांगितला आहे. प्रसांथी सध्या गुंटूर जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहे.

ड्युटीवर असताना श्याम सुंदर आणि प्रसांथी पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर आले होते. त्यामुळे श्याम सुंदर यांनी आपल्या मुलीला सॅल्युट ठोकला होता. त्यानंतर प्रसांथी यांनीही आपल्या वडिलांना सॅल्युट ठोकला आहे.

जेस्सी प्रसांथी यांनी २०१८ ला पोलीस सेवेला सुरुवात केली होती. ती २०१८ पासून ड्युटीवर असताना पहिल्यांदा दोघांची भेट झाली आहे. तेव्हा वडिलांना सॅल्युट करू नका असे सांगण्यात आले होते, तरी तिने आपल्या वडिलांना सॅल्युट केला आहे.

पोलीस दलात काम करताना वडिलांनी अनेकांची कामे केली आहे. वडिलांना पाहूनच मी पोलीस दलात सेवा करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्याकडे बघूनच मला प्रेरणा मिळत असल्याचे जेस्सी प्रसांथी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.