भारताची पहिली महिला डॉक्टर, जिने फक्त वयाच्या २२ व्या वर्षी सोडले होते जग

0

 

आज महिला वेगवेगळ्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहे. पण एककाळ असा होता, जेव्हा महिलांना चूल आणि मुलंच्या मर्यादेतच ठेवले जायचे. १८ व्या शतकात मुलींना शिक्षण दिले जायचे नाही फक्त काही मोजक्याच कुटुंबातील मुलींना शिक्षण दिले जायचे.

त्यावेळी एक-दोनच नावे समोर यायची, जे शिक्षणासाठी विदेशात जायचे. अशीच एक भारतीय महिला होती आनंदीबाई जोशी. आनंदी जोशी हि देशाची पहिली महिला डॉक्टर होती. पण ती जॉक्टर होण्यामागे सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

आनंदीबाई जोशी ३१ मार्च १९६५ मध्ये पुण्यात झाला होता. सावकाराच्या घरात जन्मलेल्या आनंदीबाईंचे माहेरचे नाव यमुना होते. त्यांचे कुटुंब एक रुढीवादी कुटुंब असल्याने त्यांच्याकडे फक्त संस्कृत वाचले जायचे.

त्यावेळी ब्रिटीशांनी सावकारांची प्रथा संपवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांचे कुटुंबाची आर्थिकस्थिती खुप बिघडली होती. अशात आनंदीबाई यांचे लग्न वयाच्या फक्त नवव्या वर्षी लावण्यात आले. त्यांचे लग्न ३० वर्षे वय असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्यासोबत लावण्यात आले.

आनंदीबाई यांनी वयाच्या १४ व्या वर्षी त्यांच्या मुलाला जन्म दिला, पण वैद्यकिय सेवा न मिळाल्यामुळे त्यांना आपल्या १० दिवसाच्या मुलाला गमवावे लागले. मुलाच्या निधनामुळे त्यांना धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी ठरवले की यापुढे कोणाचाही बाळाचा उपचाराअभावी मृत्यु होऊ देणार नाही आणि त्यांनी डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला.

आनंदीबाईंनी आपल्या या निर्णायाबाबत गोपाळरावांना सांगितले. गोपाळरांवांनी त्यांना साथ दिली आणि त्यांचे शिक्षण सुरु केले. त्यांना ऍलॉपॅथिक डॉक्टर बनायचे होते, पण त्यावेळी त्यांनी भारतात ऍलॉपॅथिकचे शिक्षण उपलब्ध नव्हते त्यामुळे गोपाळरावांनी आनंदी यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा सल्ला दिला.

आनंदीबाई यांच्या शिक्षणाविरुद्ध कुटुंब ते समाजातील लोकांपर्यंत प्रत्येकाचाच विरोध होता. पण गोपाळरांवांनी आनंदीबाईंची साथ सोडली नाही, ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
तेव्हा आनंदीबाईंनी एक भाषण दिले होते, त्या म्हणाल्या होत्या, मी फक्त डॉक्टरीचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जात आहे, माझी इच्छा नोकरी करण्याची नाही, तर लोकांचा जीव वाचवण्याची आहे. हे ऐकून समाजासुद्धा तिच्या बाजूने उभा राहिला होता.

आनंदीबाई ही एक हुशार मुलगी होती. देशातील समाजाच्या रुढी परंपरेला बाजूला सारुन ती अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी पोहचली होती. तिच्या या गोष्टींमुळे अमेरिकेच्या कॉलेजचे सेक्रेटरी आणि सुप्रिडंट खुप प्रभावित झाले होते, त्यामुळे आनंदीबाई यांना ३ वर्षांसाठी ६०० डॉलरची स्कॉलरशिप देण्यात आली होती.

अमेरिकेत त्यांनी पेंसिल्वेनियाच्या वूमन मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी डॉक्टरची पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला होता, तिथे त्यांना राहताना भाषेचा-खाण्यापिण्याचा खुप त्रास झाला पण त्यांनी तो सहन केला आणि डॉक्टरची पदवी मिळवली आणि त्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर बनल्या.

शिक्षण पुर्ण झाल्यानंतर १८८६ मध्ये त्या कोल्हापुरला परतल्या. तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर आनंदीबाईं यांना कोल्हापुरच्या स्थानिक अलबर्ड एडवर्ड रुग्णालयात चिकित्सक प्रभारी म्हणून कार्यरत झाल्या. पण वयाच्या फक्त २२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांनी फक्त २२ वर्षे जीवन जगले पण अनेक महिलांसाठी त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.