१० हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीला सोन्याचे जोडवे, वाचा आनंद शिंदेचे भन्नाट किस्से

0

 

 

अनेक कलाकार वेगवेगळ्या गोष्टींची शौकीन असतात. आतापर्यंत आपण बॉलीवूडच्या वेगवेगळ्या कलाकारांबद्दलचे शौक जाणून घेतले असाल पण आज आम्ही तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीतले प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचेबद्दलचे काही किस्से सांगणार आहोत.

आनंद शिंदे ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध गायक आहेत. त्यांचे अनेक गाणे अजरामर झाले आहे. लोकंगीते, आंबेडकरी गीते आणि चित्रपट गीतांमुळे ते आता जनतेच्या मनावर राज्य करत आहे, पण हे नाव कमवण्यासाठी त्यांना खुप संघर्ष करावा लागला होता. त्यांनी अनेकदा त्यांच्या वक्तिगत आयुष्यातील काही सांगितले आहेत, त्यातलेच हे किस्से…

२१ एप्रिल १९६१ मध्ये जेव्हा आनंद शिंदे यांचा जन्म झाला होता, तेव्हा त्यांचे वडिल प्रल्हाद शिंदे एका कार्यक्रमासाठी नागपुरला गेले होते. जेव्हा प्रल्हाद शिंदे पुन्हा मुंबईला परतले तेव्हा त्यांनी आनंद शिंदे यांचे बारसे केले होते. बारस्याच्या वेळी त्यांना १० हजारांच्या नोटांवर झोपवण्यात आले होते, असे आनंद शिंदे यांनी म्हटले होते.

शिंदे कुटुंबाला स्थिरावण्यासाठा खुप संघर्ष करावा लागला होता, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला बऱ्याचवेळा स्थलांतर करावे लागले. सुरुवातीला शिंदे कुटुंब कामाठीपुऱ्यात राहायचे.

पुढे शिंदे कुटुंब कल्याणच्या कोळसेवाडीत राहायले गेले होते, पण तिथेही स्थलांतर होत राहिल्याने आनंद शिंदे यांना तीन ते चार वेळा शाळा बदलाव्या लागल्या होत्या. त्यामुळे त्यांनी नववीपर्यंतचेच शिक्षण घेता आले होते.

आनंद शिंदे यांचे लग्न वयाच्या १८ व्या वर्षीच झाले होते. गायक म्हणून प्रसिद्ध होण्याआधीच त्यांचे लग्न झाले होते. तेव्हा गाण्याच्या कार्यक्रमामुळे त्यांच्या वडिलांना लग्नाला येणे जमले नव्हते. त्यामुळे अनुपस्थितीतच आनंद शिंदे यांचे लग्न झाले होते.

प्रल्हाद शिंदे गायक असले तरी तेव्हा त्यांना मानधन कमी मिळायचे, त्यामुळे शिंदे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीचीच होती. त्यामुळे आनंद शिंदे यांना त्यांच्या पत्नीच्या गळ्यात सोन्याच्या मंगळसुत्र घालता आले नव्हते, पण जेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली तेव्हा त्यांनी पत्नीसाठी सोन्याचे जोडवे केले होते.

आनंद शिंदे यांना तीन मुले आहेत. आनंद शिंदे यांचा मोठा मुलगा हर्षद कॉम्प्युटर इंजिनियर, तर उत्कर्ष हा डॉक्टर आहे, तर आदर्श हा गायक म्हणून पुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.