वडिलांच्या ‘या’ अंतिम इच्छेसाठी आनंद शिंदे यांनी मोडले होते पत्नीचे दागिने, किस्सा वाचून भावुक व्हाल

0

महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांना आज कोण नाही ओळखत? अनेकांना आनंद शिंदे माहित आहेत पण त्यांचे किस्से खुप कमी लोकांना माहित आहेत. काही किस्से सुखद आहेत तर काही दुखद किस्से आहेत.

त्यांचे वडिल प्रल्हाद शिंदे यांच्याबाबतही असाच एक किस्सा आहे जो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक काळ असा होता जेव्हा प्रल्हाद शिंदे आपल्या लोकगीतांमुळे आणि भक्तीगीतांमुळे घराघरात फेमस झाले होते.

प्रत्येक घरात त्यांचीच गाणी वाजत होती. पण ते समाधानी नव्हते. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्याची एक कॅसेट काढायची होती. पण त्यांची ही इच्छा त्यांना पुर्ण होताना दिसत नव्हती. त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती.

त्यांनी आपली ही इच्छा आपल्या मुलांना बोलून दाखवली. त्यांचे हे स्वप्न त्यांचा मुलगा आनंद शिंदे आणि त्यांची सुन विजया यांनी पुर्ण केले. विजया यांनी चक्क त्यांच्या अंगावरील सगळे दागिने मोडले. त्यातून ३५ हजार मिळाले.

हे पैसै त्यांनी प्रल्हाद शिंदे म्हणजे आपल्या सासऱ्यांना दिले आणि प्रल्हाद शिंदे यांचे कॅसेट बाजारात आले. तुमच्या माहितीसाठी यामध्ये सगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी होती आणि या गाण्यांना आनंद शिंदे यांनी संगीत दिले आहे.

यातील एक गाणं प्रसिद्ध लोकशाहीर विठ्ठल उमाप लिहिलं आहे. विठ्ठल उमाप यांनी लिहीलेले हे गाणे प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले होते. प्रल्हाददादा जेव्हा हे गाणे स्टुडिओमध्ये गात होते तेव्हा स्टुडिओमध्ये सर्वजण रडले होते.

हे गाणे खुप हिट झाले होते. आनंद शिंदे यांचेही अनेक किस्से आहेत. जेव्हा त्यांचे पोपटाचे गाणे मार्केटमध्ये आले होते तेव्हा ते गाणे फारसे हिट झाले नव्हते. त्यासाठी त्यांनी रेडिओ आणि वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या होत्या तेव्हा हे गाणे हिट झाले होते.

यानंतर मिलिंद आणि आनंद स्टार झाले होते. त्यानंतर त्यांनी कोंबडी पळाली, तंगडी धरून हे गाणे गायले होते. जत्रा या चित्रपटातील हे गाणे होते. या गाण्याचेही असेच झाले होते. हे गाणे सुरूवातील हिट झाले नव्हते.

सिनेमा रिलीज झाल्यानंतरही हे गाणे हिट झाले नव्हते. नंतर २ वर्षानंतर हे गाणे हिट झाले होते. हा किस्सा स्वता आनंद शिंदे यांनी सांगितला होता. त्यांचे अनेक किस्से आहेत. आनंद शिंदे डबल मिनिंग गाणी गातात असा आरोपही त्यांच्यावर अनेकवेळा झाला आहे. पण आनंद शिंदे म्हणतात की पुरूषांपेक्षा माझ्या गाण्याला महिलांचा प्रतिसाद जास्त असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.