कोरोना योद्धा: कॅन्सर झाला हे माहित असून ‘हा’ पोलीस अधिकारी करत होता कोरोना काळात लोकांची मदत

0

 

कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी कोरोना योद्धे आपल्याला दिवसरात्र काम करताना दिसून आले आहे. त्यामध्ये पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, साफसफाई कर्मचारी सर्व योद्धे आपली जबाबदारी पूर्णपणे सांभाळताना दिसून आले आहे.

अशात दिल्ली पोलिसमधले आयपीएस अधिकारी यांनी तर पोलीस कर्मचाऱ्यांसमोर एक आदर्शच निर्माण केला आहे. या आयपीएस अधिकाऱ्याने कॅन्सर असूनही कोरोना संकटात आपली जबाबदारी कर्तव्यदक्ष राहून पार पाडली आहे.

या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आनंद मिश्रा असे आहे. जेव्हा त्यांना कळले की आपल्याला थायरॉईड ग्रंथीमध्ये कॅन्सर आहे, तेव्हा त्यांना धक्काच बसला होता. पण आपल्या जबाबदारी पूढे त्यांनी कॅन्सरला आडवे येऊ दिले नाही आणि त्यांनी आपले काम सुरूच ठेवले.

त्यानंतर मिश्रा एकदा डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेले असता, त्यांना असे कळले की कॅन्सर थायरॉईड ग्रंथींमध्ये वाढत चालला आहे. त्यामुळे त्यांचे ऑपरेशन करण्यात आले. मिश्रा ४८ तास डॉक्टरांच्या निरीक्षणात होते.

दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते ज्या ठिकाणी ड्युटीला होते त्या ठिकाणी अनेक स्थलांतरीत मजूर फसलेले होते, त्यामुळे रुग्णलायत भरती होण्याचे आधी प्रत्येक दिवशी स्थलांतरित मजुरांना मिश्रा अन्न पुरवायला जायचे.

रुग्णलयात भरती होण्याआधी पण ते आपले कर्तव्य, आपली जबाबदारी पार पाडताना ते दिसून येत होते. त्यानंतर ऑपरेशनसाठी त्यांना राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.