आनंद दिघे: जिल्हाप्रमुख पदावर असूनही कार्यालयात राहून करकर्त्यांनी आणलेले डबे प्रेमाने खाणारा नेता

0

 

 

शिवसेना नेते आनंद दिघे यांची आज जयंती. ठाण्यात शिवसेनेचे सुत्र तळागाळापर्यंत पोहचवण्याचे कामही आनंद दिघे यांनीच केले. ९० च्या दशकात तर शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे आनंद दिघे. चला तर मग जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…

१.आनंद दिघे यांचे पुर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे असे होते.

२. आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ ला झाला होता.

३. शिवसेनेला जेव्हा ठाण्यामध्ये सामान्य लोकांमधून आलेल्या आणि आपलेसे वाटणाऱ्या नेतृत्वाची गरज होती, तेव्हा ती गरज आनंद दिघे यांनी पुर्ण केली होती. आजही ठाणे जिल्ह्यात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे.

४. जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आल्यानंतर ते टेंभी नाक्यावरील कार्यालयातच रहायचे, अनेकदा त्यांना कार्यकर्तेच डब्बा आणून द्यायचे.

५. टेंभी नाक्याजवळ त्यांनी आनंद आश्रमाची स्थापना केली होती. त्या आश्रमात दररोज सकाळी जनता दरबार भरायचा. तिथे दिघे यांना आपल्या तक्रारी सांगण्यासाठी लोक रोज सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लावायचे.

६. लोक आनंद दिघे यांना फक्त शहरातल्याच नाही, तर पुर्ण ठाणे जिल्ह्यातल्या समस्या सांगायचे. दिघे लोकांच्या समस्या तत्काळ सोडवायचे. ते तिथूनच फोन करायचे आणि त्याच्या समस्या सोडवण्याबाबत सुचना द्यायचे. त्यांनी कधीच बघू, करु अशी उत्तरे दिली नाही. अनेकदा त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्याठी रोखठोक भुमिका घेतली होती.

७. आनंद दिघे यांची जनसामान्यांमध्ये आपला नेता म्हणून ओळख होती. ठाण्यातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यातही मोठा वाटा होता. त्यांनी महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळवून दिल्या होत्या.

८. फ्रंटलाईन मासिकात आनंत दिघे यांच्या संदर्भात एक लेख प्रसिद्ध झाला होता, त्यात दिघेंच्या नेतृत्वाचे वर्णन कराताना, दिघेंनी कोणतीही निवडणूक लढवली नसली किंवा कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नसली, तरी ते ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे झाले होते, असे मत मांडण्यात आले होते.

९. २४ ऑगस्टला २००१ ला ठाण्यातील वंदना टॉकीजसमोरच्या रस्त्यावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते आणि डोक्याला मार लागला होता. २६ तारखेला त्यांच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

१०. त्याच दिवशी म्हणजे २६ तारखेला संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास त्यांना पहिला ह्रदयविकाराचा झटका आला, त्यानंतर काही वेळात त्यांना पुन्हा एक ह्रदयविकाराचा झटका आला. तेव्हा डॉक्टरांनी दिघेंना वाचवण्याचे पुर्ण प्रयत्न केले पण अखेर साडे दहाच्या सुमारास दिघेंचे निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.