प्रेरणादायी! ४६ वर्षीय अम्मा युट्यूबवरून कमावतात लाखो रूपये, वाचा कसे…

0

युट्यूब असा सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहे ज्याच्याद्वारे आपण भरघोस कमाई करू शकतो. तसे पाहायला गेले तर प्रयत्न करणाऱ्याला आणि इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस कोणत्याही यशाची पायरी चढू शकतो.

अशाच एका महिलेबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. ही कहाणी आणि जौनपुरच्या शशिकला चौरसिया यांचीय ४६ वर्षीय शशिकला युट्यूबवर विविध प्रकारच्या खायचे पदार्थ जौनपुरिया अंदाजात बनवलेल्या पदार्थांचे व्हिडीओ अपलोड करत असतात.

त्या विविध प्रकारच्या डिशेज आणि रेसिपी सांगतात. त्यांचा एक युट्यूब चॅनेल आहे ज्याचे नाव आहे अम्मा की थाली. या युट्यूब चॅनेलवर १.३७ मिलियन म्हणजे १३ लाख ७० हजार सब्सक्राइबर आहेत.

त्यांनी आतापर्यंत २२ व्हिडीओज अपलोड केल्या आहेत आणि त्यांच्या २२ व्हिडीओजला १ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. शशिकला यांचा मोठा मुलगा चंदन आणि लहान मुलगा सूरज हे दोघेही त्यांना या कामात मदत करतात.

सूरज हा व्हिडीओ एडिटींगचे काम करतो आणि चंदन हा व्हिडीओ रेकॉर्डिंगचे काम करतो. त्यांनी ८ नोव्हेंबर २०१७ ला हे चॅनेल सुरू केले होते. ते त्यांच्या आईला अम्मा म्हणत असत. मग त्या दोघांनी विचार केला की आपण आपल्या चॅनेलला अम्मा की थाली हे नाव देऊया.

त्यांनी पहिला व्हिडीओ सुप्रसिद्ध बुंदी खीरचा टाकला होता. पण या व्हिडीओला जास्त प्रतिसाद आला नाही. त्यांनी सहा महिने व्हिडीओ बनवले. परंतु त्यांना जास्त यश आले नाही. त्यानंतर त्यांनी कैरीचे लोणचे कसे बनवायचे याचा व्हिडीओ टाकला होता.

३१ मे २०१८ ला त्यांनी हा व्हिडीओ टाकला होता. त्यांच्या व्हिडीओला खुप चांगला प्रतिसाद आला. त्यावेळी त्यांचे ३ हजार सब्सक्राईबर होते. पण नंतरच्या तीन महिन्यात त्यांचे १ लाख सब्सक्राइबर झाले

. मग त्यांच्या व्हिडीओजला खुप लोक पाहू लागले आणि त्यांचे आज १३ लाख ७० हजार फॉलोवर्स झाले आहेत. त्यांच्या मुलांनी सांगितले की, जसजसे आमची कमाई वाढत गेली तसतसे आम्ही नवीन डिएसएलआर कॅमेरा घेतला, एडिटिंग सॉफ्टवेअर आणि नवीन लॅपटॉप घेतला.

आम्ही प्रत्येक आठवड्यात ५ व्हिडीओ बनवत होतो. आतापर्यंत आमच्या चॅनेलवर ४५० पेक्षा जास्त व्हिडीओज अपलोड झाले आहेत. लवकरच आम्ही एक स्टुडिओ तयार करणार आहोत. त्या ठिकाणी आम्हाला अधिक पद्धतशीरपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.