६५ हजार रुपये उधार मागून हा व्यवसाय सुरु केला, आता होतेय लाखोंची उलाढाल

0

 

अनेक लोकांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न असते, पण व्यवसाय तोच यशस्वी होतो, ज्याची कल्पना भन्नाट असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत, ज्या माणसाला युट्युब बघता बघता एका आगळ्या वेगळ्या व्यवसायाची कल्पना सुचली आणि आता तो याच व्यवसायातून तगडी कमाई करत आहे.

जयपुरमध्ये राहणाऱ्या या माणसाचे नाव अमित कुमार आहे. ते एक बेरोजगाराचे जीवन जगत होते कारण त्यांना स्वत:चा व्यवसाय करायचा होता. त्यांच्या घराशेजारीच पारिकचे दुकान होते, त्या दुकानातून मसल्यांचे पॅकेट्स यायचे, त्याची इच्छा होती, की ते एकेदिवशी मसाल्याच्या पॅकेट्सची पॅकींगचे काम सुरु करतील.

अमित नेहमीच युट्युबवर वेगवेगळ्या बिझनेस आयडियाचे व्हिडिओ पाहत असायचे. एकेदिवशी त्यांना युट्युबच्या एका चॅनेलवर मसाला पॅकींगबाबत माहिती मिळाली.
त्यामुळे त्यांनी एक मसाला पॅकींगचे एक मशीन खरेदी करण्याचे ठरवले, त्यांनी एका नंबरवर फोन केला, तो माणूस ब्लिस्टर पॅकींगची मशीन सप्लाय करायचा. तेव्हा त्यांनी अमित यांना त्यांच्याकडे बोलावून घेतले.

ती मशीन ६५ हजारांची होती, तसेच या मशीनच्या माध्यामातून एका तासामध्ये १०० ते १५० पीस तयार केले जायचे. पण अमित यांच्याकडे फक्त १० हजार रुपये होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले आणि ती मशीन खरेदी केली.

त्यानंतर त्यांनी मसालाच्या पॅकींगसाठी मटेरियल सुद्धा खरेदी करायचे होते, पण त्यांच्याकडे पैशांची कमी होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांची मदत घेतली आणि ते मटेरियल खरेदी केली. त्यासाठी त्यांना३० ते ३५ हजार रुपये खर्च आला. अशाप्रकारे त्यांना पुर्ण व्यवसाय सुरु करण्यासाठी ९५ हजार रुपये लागले.
अशात त्यांनी त्यांच्या शेजारच्यांची मदत घेतली आणि पॅकींग करण्यासाठी त्यांच्या मदतीने उधारीवर माल मिळवला. त्यांच्या या कामात त्यांच्या कुटुंबाने सुद्धा साथ दिली. त्यांनी इलायची, लौंग, काळी मिर्च, बदाम, किसमिस, अशा गोष्टींची पॅकींग करण्यास सुरुवात केली.
अमित मटेरियल पॅक करायचे आणि त्यांचा मुलगा ते मटेरियल जागेवर लावायचा. विशेष म्हणजे आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी कधीच बाजारात गेले नाही. त्यांनी परिसरात सांगून ठेवले होते की प्रॉडक्ट्स तयार आहे.

तेव्हा सुरुवातीला दोन सेल्समन त्यांच्याकडे आले, तेव्हा त्यांना एका पॅकेटवर १० रुपयांचे कमीशन मिळणार होते. तसेच त्यांनी पॅकेट्स अशाप्रकारे तयार केले होते, ज्यात ५ ते ७ रुपयांचा त्यांचा फायदा होईल.

सुरुवातीला त्यांना ऑर्डर्स मिळण्यात खुप अडचणी येत होत्या, पहिल्या महिन्यात तर त्यांना १०० पॅकेट्सच विकले गेले. पण लॉकडाऊनमध्ये त्यांचा चांगलाच फायदा झाला, दिवसाला त्यांची विक्रि चांगलीच वाढली होती, त्यातून आता त्यांची महिन्याला ४० ते ४५ हजार रुपयांची कमाई करत आहे.

आता त्यांनी एक स्क्रब बनवण्याचे मशीन सुद्धा खरेदी केले आहे. त्यासाठी अमित यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांचे हे प्रॉडक्ट्स आता मार्केटमध्ये सुद्धा विकले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.