पुणेकरांना मिळणार मराठवाड्याच्या खाद्यपदार्थांचा स्वाद; कोरोनामुळे व्यवसाय बंद पडल्याने सुरू केला फूडस्टॉल

0

 

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अशावेळी खचून न जाता अनेकांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे आणि त्यातुन त्यांची चांगलीच कमाई होत आहे.

आजची हि गोष्ट अशाच एका दाम्पत्याची आहे ज्यांचा ट्रॅव्हल आणि टुरिझमचा व्यवसाय लॉकडाऊनध्ये बंद पडला. पण परिस्थितीमुळे खचून न जाता त्यांनी फूडस्टॉल सुरु केले आहे.

या दाम्पत्याचे नाव अमित कुलकर्णी आणि आस्मी कुलकर्णी असे आहे. त्यांनी फुड बिझनेस सुरु केला असून या दाम्पत्याने मराठवाड्यातील खाद्यपदार्थ पुण्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

लॉकडाऊनच्या आधी त्यांचा ट्रॅव्हल आणि टुरिझमचा व्यवयास होता. पण लॉकडाऊन काळात सर्वकाही बंद असल्याने त्यांना व्यवसायात खुप नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी फुड व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला त्यांनी घरगुती पिठे विकण्यास सुरु केले, लॉकडाऊन काळात त्यांना या व्यवसायात चांलाच प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अमित कुलकर्णी यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने मराठवाड्यातील खाद्यपदार्थ बनवून विकण्यास सुरुवात केली.

आता त्यांनी मराठवाड्यातील खाद्यपदार्थ म्हणजेच उदगीरचा सुशीला, लोणी धपाटे, थालिपीठ, उस्मानाबादचा काला जामून, जिलेबी, गुजराती फाफडा असे विविध चविष्ठ पदार्थ त्यांनी विकण्यास सुरुवात केली.

मराठवाड्यातून पुण्यात स्थानिक झालेल्या लोकांना तसेच पुणेकरांना मराठवाड्यातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा, असाही त्यांचा एक उद्देश हे फूडस्टॉल सुरू करण्यामागे होता.

लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या व्यवासाय बंद पडले नोकऱ्या गेल्या, अशात अमित आणि आस्मी यांचा व्यवसाय बंद पडला पण खचुन जाता त्यांनी एक नवा व्यवसाय सुरु केला. त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.