लॉकडाऊनमध्ये शिकला बल्ब बनवायला, आता कमवतोय लाखो रुपये

0

 

लॉकडाऊनमध्ये  प्रत्येकाला घरीच बसावे लागले होते, अशात लॉकडाऊनमध्ये शाळाही बंद असल्याने सर्वही मुले घरीच होती. त्यामुळे काहींनी रिकाम्या वेळाचा सदुपयोग केला असून नवनवीन गोष्टी शिकल्या आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहोत जो लॉकडाऊनमध्ये चक्क बल्ब बनवायला शिकला आहे, इतकेच नाही तर त्याने एक कंपनी सुरु करुन त्यातून तो आता लाखोंची कमाई करत आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपुरमध्ये राहणाऱ्या या मुलाचे नाव अमर प्रजापती आहे. तो आठवी इयत्तेत शिकतो. लॉकडाऊन काळात रिकामे बसून राहण्यापेक्षा त्याने बल्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले.  सुरुवातीला त्याने छोट्या दुकानापासून रस्त्यावरच हा व्यवसाय सुरु केला, पण त्याचा हा व्यवसाय खुप लवकर वाढला.

लवकरच त्याने एक एलईडी बनवणारी कंपनी सुरु केली, त्याने आता चार लोकांना नोकऱ्याही दिल्या आहे. आता हा व्यवसाय अमरला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर न्यायचा आहे, त्यासाठी त्याचे काम सुरु असून त्याने वेबसाईटही तयार केली आहे.

बल्बचे प्रशिक्षणचे म्हणाल तर अमर फक्त पाच दिवसात बल्ब बनवायला शिकला आहे. त्याने फक्त पाच दिवसात पाच प्रकारचे बल्ब बनवले होते. त्याने आपला हा व्यनसाय वडिलांच्या मदतीने सुरु केला आहे.

सुरुवातीला ते १० ते १५ बल्ब बनवायचे पण आता ते दिवसाला ७०० बल्ब बनवतात. त्याने आपल्या कंपनीचे वडिलांच्या नावावर दिले आहे, तर कंपनीचे एमडी म्हणून काम त्याची आई सांभाळत आहे.

व्यवसाय सुरु करताना त्याच्या आई-वडिल दोघांचाही पाठिंबा होता, त्याचे वडिलांना हा व्यवसाय करण्यासाठी दोन लाखांची मदत केली होती. त्याच्या कंपनीने पाच लाखांचा माल विकला असून आतापर्यंत त्याने अडीच लाखांची कमाई केली आहे.

कमी किंमतीत जास्त गुणवत्ता असल्याने अमरच्या कंपनीचे बल्ब विकले जात आहे. दोन लाखांपासून सुरु झालेला हा व्यवसाय आता ८ लाखांवर पोहचला आहे. तो शिक्षण घेत असून जेव्हा तो ऑनलाईन शिक्षणातून फ्रि होतो, तेव्हा तो आपल्या कंपनीत काम करण्यास सुरुवात करतो.

मला पुढे जाऊन वैज्ञानिक व्हायचे आहे, असे अमरने म्हटले आहे. तर मुलांना ज्या गोष्टी आवडतात, त्या गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, तसेच त्यांचे मार्गदर्शन केले पाहिजे, असे अमरच्या आईने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.