या गाण्याच्या रातोरात विकल्या गेल्या होत्या ७० लाख कॅसेट्स, कॅसेट्स घेण्यासाठी लोकांनी सोडले होते शहर

0

आजच्या काळात आपल्याला आपल्या आवडीचे गाणे ऐकण्यासाठी फक्त एका क्लिकची गरज पडते. इंटरनेटमुळे सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण आम्ही त्या वेळेची गोष्ट सांगणार आहोत जेव्हा गाणी ऐकण्यासाठी बाजारातून कॅसेट आणावी लागत होती. ही गोष्ट आहे ९० च्या दशकातील.

त्यावेळी स्मार्टफोन, आयपॅड, टॅब नव्हते. अगदी क्वचित काही लोकांकडे लॅपटॉप किंवा मोबाईल, टॅब पाहायला मिळायचा. त्या दशकात जर आपण टीव्हीवर एखादे गाणे पाहिले तर आपल्याला पुन्हा ते गाणे ऐकण्याची ईच्छा झाली तर आपल्याला खुप वाट बघावी लागत असे. आणि तुम्हाला जर खुपच तीव्र ईच्छा झाली असेल तर बाजारातून कॅसेट आणावी लागत असे.

ज्यावेळी एखाद्याला आपली आवडती गाणी ऐकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता, तेव्हा एका गाण्याने धुमाकूळ घातला होता. 1997 मध्ये त्या गाण्याने सगळ्यांना वेड लावले होते आणि ते गाणे आजही खुप प्रसिद्ध आहे. १९९७ मध्ये अल्ताफ राजा यांनी आपला तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे हा अल्बम आणला होता.

त्यावेळी दूरदर्शन वाहिनीच्या अनेक संगीत कार्यक्रमात हे गाणे टॉपला होते. लोक या गाण्यामागे इतके वेडे झाले होते की टी-स्टॉल, गल्ली कोपरा, दुकान, पार्टी, घर, बस इत्यादी ठिकाणी हे गाणए सर्रास वाजवले जात होते. सुमारे 7 महिने या गाण्याची जादू लोकांच्या कानावर होती. कोणीपण असो त्याच्या तोंडावर हेच गाणे असायचे.

तो काळ असा होता की लोक ऑडिओ कॅसेटवर गाणी ऐकायचे आणि संगीत कॅसेट सेंटरमध्ये जाऊन गाणी ऐकायचे. असे म्हणतात की त्यावेळी अल्ताफ यांचे हे गाण्याच्या ६० ते ७० लाख कॅसेट्स विकल्या गेल्या होत्या. एकेकाळी विक्री इतकी वाढली होती की कॅसेट संपल्यावर लोक कॅसेट खरेदी करण्यासाठी दुसर्‍या शहरात जायचे.

हे गाणे त्या वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय गाणे होते. रातोरात या गाण्याच्या कॅसेट्स संपल्या होत्या. सर्वाधिक ऑडिओ कॅसेट विकल्यामुळे या गाण्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली होती. आता हल्ली आलेल्या गाण्यांचा विचार करा, ही गाणी नक्कीच पटकन तुमच्या लक्षात राहतात पण एका आठवड्यानंतर तुम्ही ते गाणे विसरता कारण नवीन गाणे आल्यानंतर तुम्ही जुणे गाणे विसरून जाता.

अशा परिस्थितीत त्यावेळी आपली ओळख बनवणे किती अवघड होते याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. कारण तेव्हा सोशल मिडीया नव्हते, मोबाईल स्मार्टफोन नव्हते. त्यावेळी अल्ताफ राजा यांनी आपल्या गाण्याची जादू सगळ्यांवर चालवली होती. अजूनही तुम्ही जर काही प्रौढ लोकांना विचारले की तुमचे आवडते गाणे कोणते? तुम्हाला त्यांच्या तोंडून हेच गाणे ऐकायला मिळेल.

आताच्या पिढीतल्या मुलांना किंवा लोकांना या गाण्याची किंमत कळणार नाही. कदाचित आजच्या काळातही असे बरेच लोक असतील ज्यांना जुन्या गाण्यांची किंमत माहित असेल. नाहीतर आताच्या काळात जुन्या गाण्यांचा रिमेक करण्याची नवीन क्रेझ आली आहे. पण मुळात काही लोकांना हे आवडत नाही कारण जुने ते सोने असते हे मान्य केले पाहिजे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.