कडक सॅल्युट! कोरोनाच्या संकटातच नाही तर केदारनाथच्या जलप्रलयातही केली होती ‘या’ मुलीने लोकांची मदत

0

 

२०१३ साली केदारनाथमध्ये मोठा जलप्रलय झाला होता. तेव्हा अनेक पर्यटक फिरण्यासाठी गेले होते, त्या पर्यटकांमध्ये आपल्या कुटूंबासोबत एलिस शर्मा हि मुलगी सुद्धा होती.

या भयंकर जलप्रलयात अनेकांचे धैर्य संपले होते, पण अशावेळी एलिसने अनेक लोकांना मदतीचा हात दिला होता. केदारनाथमध्ये आलेल्या अनुभवानंतर एलिसने २०१८ मध्ये ‘वस्त्र और जिंदगी’ या फाऊंडेशनची स्थापना केली होती. ती सध्या २३ वर्षाची आहे.

२०१८ मध्ये दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी पडली होती. त्यावेळी एलिसने गरीब, गरजू आणि असाह्य लोकांना मदत केली होती, कडाक्याची थंडी असल्याने तिने लोकांना पांघरुन तसेच अन्न आणि कपडे पुरवले होते.

तिचे फाऊंडेशन नेहमीच गरजू लोकांची मदत करत असते. गेल्यावर्षी जेव्हा मार्चमध्ये लॉकडाऊन झाले, तेव्हा पण ती गरजू लोकांच्या मदतीला धावून आली होती.

एलिसने आणि तिच्या टिमने मिळून जवळपास १५ हजार गरीब आणि गरजू लोकांना मदत केली होती. कोरोनाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी तिने फंड जमवले होते. तेव्हा अनेक समस्यांना तोंड देऊन लोकांपर्यंत तिने गरजेच्या वस्तु पोहचवल्या होत्या.

तसेच महिलांच्या प्रश्नावरही एलिस बोलत असते. महिलांच्या मासिक पाळीच्या काळात स्वच्छता पाळण्याचे काय असते, याबाबत ती जागृती करतानाही आपल्याला दिसून येते.

काही महिलांना सॅनिटरी पॅड विकत घेणे शक्य नसते, तर अनेक महिलांना विकत घेणे शक्य असले तरी गैरसमज निर्माण झाल्याने ते पॅड विकत घेण्यास घाबरतात. त्यामुळे वेगवेगळे आजार होतात, असे एलिसने म्हटले आहे.

आपल्या टीमसोबत जाऊन एलिस ठिकठिकाणच्या वस्त्यांमध्ये जाऊन जात या विषयावर जागृती करत असते. तिने आतापर्यंत सात पुस्तके लिहली आहे. अशाप्रकारे जलप्रलयापासून ते कोरोनाच्या संकटापर्यंत ती लोकांना मदत करताना दिसून आली आहे. तसेच समाजातल्या वेगवेगळ्या विषयांवर ती जनजागृती करताना दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.