नाद नाय करायचा! पठ्ठ्याने केवळ दोन इंच उंची वाढवण्यासाठी खर्च केले ५५ लाख

0

 

सौंदर्यासाठी अनेक लोक वेगवेगळे उपाय करत असतात. त्यात गोरे दिसण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम लावणे, वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे डायट अशा वेगवेगळ्या गोष्टी लोक करत असतात.

अशात अनेक लोक असेही असतात ज्यांना आपली उंची वाढवायची असते, पण त्याला क्रीम डायट अशा गोष्टी लवकर उपयोगी पडत नाहीत. असे असताना एका अमेरिकन तरुणाने भारतात येऊन आपली उंची वाढवली आहे.

सध्या अमेरिकेतल्या अल्फोंसो फ्लोरेस या तरुणाचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसून येत आहे. कारण या तरुणाने ३० वर्षाच्या वयानंतर सुद्धा आपली उंची दोन इंचांनी वाढली आहे.

अल्फोंसो फ्लोरेस अमेरिकेतला रहिवासी आहे. त्याची लहानपणापासून अशी इच्छा होती की, आपली उंची ६ फुटांपेक्षा जास्त असावी. एका बास्केटबॉलपटू सारखी.

त्यामुळे त्याने जगभरात शोध सुरू केला. त्याने जगभरातल्या वेगवेगळ्या डॉक्टरांबाबत माहिती काढली जे त्याला उंची वाढवून देण्यात मदत करू शकतात. अखेर त्याने भारतात येऊन सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.

सर्जरीनंतर अखेर त्याची इच्छा पुर्ण झाली. सर्जरीच्या आधी त्याची उंची ५ फूट ११ इंच होती, आता सर्जरीनंतर त्याची उंची वाढली असून ६ फूट १ इंच झाली आहे. मात्र या सर्जरीसाठी त्याला तब्बल ५५ लाख रुपये किंमत मोजावी लागली आहे.

अल्फोंसो फ्लोरेसवर सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांचे नाव डॉ. देवीप्रसाद असे आहे. त्यांनी लिम्बप्लास्टिक्स कॉस्मेटीक प्रक्रियेच्या माध्यमातून ही सर्जरी करण्यात आली आहे. या सर्जरीमध्ये मांडीमध्ये असणाऱ्या हाडांची उंची वाढवली जाते.

मला माझ्या कुटूंबियांनी आणि मित्रांनी हि सर्जरी करण्यास मना केले होते, पण माझी खुप इच्छा होती की माझी उंची ६ फुटांपेक्षा जास्त असावी, त्यामुळेच मी ही सर्जरी केली आहे, असे अल्फोंसो फ्लोरेसने डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.