जाणून घ्या, अमिताभ बच्चन यांच्या संकटकाळात त्यांची मदत करणारे अजिताभ बच्चन यांच्याबद्दल…

0

बॉलिवूडमध्ये बच्चन कुटूंबाला मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान आहे. महानायक अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय-बच्चन नेहमीच चर्चेत असतात.

बच्चन सिर्फ नाम ही काफी है, असं अनेकदा आपण ऐकतो, पण तुम्हाला माहितीये का बच्चन फॅमिली फक्त अमिताभ बच्चन यांच्यापर्यंतच सिमीत नाहीये. अमिताभ बच्चन यांना एक लहान भाऊ असून त्यांचे नाव अजिताभ बच्चन असे आहे.

अजिताभ बच्चन अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. अजिताभ नेहमीच लाईमलाईटपासून दुर राहतात. अजिताभ हे एक बिझनेसमॅन आहे. ज्यावेळी बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन स्ट्रगल करत होते, त्यावेळी अजिताभ यांनी अमिताभ बच्चन यांना आधार दिला होता. तसेच त्यांनी अमिताभ यांना आर्थिक मदतही केली होती.

आधी अमिताभ हे एवढे बोलके नव्हते. तेव्हा अजिताभ यांची बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख होती. अजिताभ बॉलिवूडच्या कोणत्याही माणसाला भेटायला गेले असता, ते अमिताभ बच्चन यांना घेऊन जायचे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना मिळालेल्या यशाचे श्रेय अजिताभ यांनाही जाते.

अजिताभ सुरुवातीला लंडनमध्ये राहून आपला व्यवसाय सांभाळत होते. त्याठिकाणी त्यांची पत्नी रमोला यांनीही अजिताभ यांच्या व्यवसायात मोठी मदत केली होती. मात्र २००७ मध्ये त्यांची आई तेजी बच्चन यांचे निधन झाले. त्यामुळे अजिताभ आपल्या पुर्ण कुटूंबासह भारतात परतले.

अजिताभ यांच्या पत्नी एक यशस्वी उद्योजिका आहे. त्यांना त्यांच्या कामासाठी २०१४ मध्ये एशियन ऑफ द ईयर असा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. त्यांचा मुलगा भीम एक बँकर आहे.

तसेच नैना, निलिमा, नम्रता असे या तीन मुलींचे नाव आहे. निलिमा एयरॉटीकल इंजिनियर आहे. नम्रता एक आर्टिस्ट आहे. तर नैना इन्वेस्टमेंट बँकर आहे. अजिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब जरी लाईमलाईटमध्ये दिसून येत नसले तरी त्यांच्या क्षेत्रात ते चांगलेच यशस्वी झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.