देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या ‘त्या’ शपथविधीच्या आधी घडलेला संवाद आला समोर; एकदा वाचाच…

0

गेल्यावर्षी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

गेल्यावर्षी २३ नोव्हेंबरला हा शपथविधी झाला होता. हे सरकार जेमतेम ८० तास टिकले होते. मात्र आता या सरकार स्थापनेच्या पडद्याआड असणारी गोष्ट समोर आली आहे. इनसायड स्टोरी लेखिका प्रियम गांधी यांनी ‘ट्रेडिंग पावर’ या पुस्तकातून पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक खुलासे केले आहे.

उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली होती. अजित पवारांच्या या भाजपसोबत झालेल्या हात मिळवणीने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते, मात्र अजित पवारांनी हा निर्णय का घेतला होता, हे या पुस्तकात मांडण्यात आलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय बदलून काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार स्थापनेचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अजित पवारांची आणि देवेंद्र फडणवीसांची अशी चर्चा झाली होती.

दादा, भाजपा-राष्ट्रवादीच्या डिलला पवारासाहेबांचा पाठिंबा मिळणार नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. आमच्या सगळ्या सूत्रांकडून आम्हाला हेच समजत आहे.. नेमकं काय सुरू आहे?, असा प्रश्न फडणवीसांनी अजित पवारांना केला होता.

त्यावर अजित पवार म्हणाले, तुम्ही जे बोलताय ते खरं आहे. चित भी मेरा पट भी मेरा असं पवारांचं धोरण दिसतंय. पवारांना वाटतंय की, शिवसेनेला पाठिंबा दिला तर सगळी सत्ता आपल्या हातात राहील, अशी संधी कोण सोडणार बरं?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमची भूमिका काय…?

अजित पवार म्हणाले, मी अजूनपर्यंत भाजप आणि तुमच्यासोबत आहे.

तेव्हा, तुम्ही पुरेसे संख्याबळ जमवू शकाल का? असा प्रश्न फडणवीसांनी केला.

या घडीला माझ्याकडे २८ आमदार आहे. सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील टिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील–शिवाय तेरा आणखी, अशी लांबलचक यादी अजित पवारांनी वाचली.

पुढे पवार म्हणाले, माझ्याकडचे २८ आमदार मी सांगेल ते करतील आणि तुमच्याकडे असलेले संख्याबळ आणि अपक्ष आमदारांच्या जोरावर आपण बहुमत मिळवू शकू.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, या सर्व आमदारांना आपण बाहेर राज्यात घेऊन जायचे का, तुम्हाला काय वाटतं? ते बाहेर सुरक्षित राहतील का?

अजित पवार म्हणाले, नाही नाही, सगळ्या आमदारांना इथेच थांबू द्या. इथे राहिले तर कदाचित ते इतर आमदारांचे मनपरिवर्तन करू शकतील. यासाठी व्यूहरचना करावी लागेल, मी याबाबत माझ्या सहकाऱ्यांशी बोलतो.

तसेच अजित पवार पुढे म्हणाले, आपण चार आमदारांचा एक गट करू, माझ्या विश्वासातले २८ आमदार ग्रुपचे लीडर म्हणून काम करतील. उरलेल्या १-१ आमदारांचे मन वळवायचे काम हे २८ आमदार करतील.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, होय दादा.. सगळं चोख पार पडलं पाहिजे. आपण फार मोठी जोखीम पत्कारतो आहे. हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे, होय ना..?

या पुस्तकातील काही भाग समोर आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रियम गांधी यांचे पुस्तक २८ नोव्हेंबरला वाचकांच्या भेटीला येणार आहे. २३ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या शपथविधीची इनसाईड स्टोरी घडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.