पायलटचे कपडे घालून ‘हा’ माणूस विकतोय नूडल्स; कारण वाचून बसेल धक्का

0

 

 

लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्या बंद पडल्या आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे अनेक लोकांनी स्वता:चा व्यवसाय सुरु केला आहे.

आजची ही गोष्ट पण अशाच एका माणसाची आहे. ज्याची कोरोनामुळे पायलटची नोकरी गेली पण त्याने हिंमत न हारता नूडल्सचे स्टॉल सुरु केले आहे. या क्षेत्रात पण त्यांनी उंच अशी झेप घेतली.

पायलट अजरीन मोहम्मद जाववी असे या माणसाचे नाव आहे. अजरीन हे मलेशियाचे पायलट आहे. कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांची नोकरी गेली. पण त्यांनी स्वता:चा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी नूडल्सची गाडी सुरु केली.

अजरीन आपल्या नूडल्सच्या गाडीवर काम करताना पायलटचा युनिफॉर्म कधीच काढत नाही. ते आपल्याला नेहमीच पायलटच्या युनिफॉर्मवर आणि टोपीवर दिसतात.

अजरीन गेल्या २० वर्षांपासून पायलटची नोकरी करत होते. त्यांचे वय ४४ आहे. इतक्या वयातही त्यांनी नूडल्सची गाडी सुरु केली. त्यांच्या या स्टाईलमुळे त्यांच्याकडे वेगवेगळे ग्राहक आकर्षित होत असतात.

त्यांच्या या फुडस्टॉलचे नाव कॅप्टेन कॉर्नर असे आहे. सोशल मीडियावर पण या स्टॉलचे बरेच फोटो व्हायरल होत असतात. त्यांच्या हटके अंदाजामुळेच त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे.

मी माझ्या कुटूंबासोबत राहतो, मला चार मुले आणि बायको आहे. नोकरी गेल्यामुळे मला उत्पन्नाचे काही साधन नव्हते. पोट भरण्यासाठी मला पैशांची खुप गरज होती. त्यामुळे मी हे फुडस्टॉलचा व्यवसाय सुरु केला आहे, असे अजरीन यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे, त्यामुळे अनेक लोकांवर आर्थिक संकट आले आहे. अशात ४४ वय असताना एक नवीन सुरुवात करणाऱ्या अजरीन यांची गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.