जेव्हा ऐश्वर्याला इंग्लिश बोलताना बघून शॉक झाले होते अमेरिकेचे लोक, वाचा तो किस्सा

0

 

जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून अनेकदा ऐश्वर्या रायचा सन्मान करण्यात आला होता. ऐश्वर्या जेवढी ऑनस्क्रिन जेवढी ऍक्टीव्ह दिसते, तेवढीच ती ऑफस्क्रिन सुद्धा ऍक्टीव्ह असते, अनेकदा ती तिच्या स्टेटमेंटमुळे सुद्धा अनेकवेळा चर्चेत आली आहे. आज असाच २००५ तिचा एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत.

२००५ मध्ये ऐश्वर्या अमेरिकेत गेली होती. तेव्हा ऐश्वर्या तिथल्या प्रसिद्ध टिव्ही शो ओप्रा विन्फ्री शोमध्ये गेली होती, जेव्हा त्या शोमध्ये भारतीय संस्कृतीच्या खुप गंभीर गोष्टी तिने हसत हसत विचारल्या होत्या, तेव्हा तिने ओप्राला सडेतोड उत्तर देत तिचे तोंड बंद केले होते.

ओप्राने भारतीय महिलांच्या सेक्सुऍलिटीवर प्रश्न विचारला होता, तसेच भारतीय महिला सुंदर दिसण्यासाठी लाखो-करोडो रुपये खर्च करताता का? असा प्रश्नही विचारला होता, हा प्रश्न खुप गंभीर होता पण ओप्राने तो हसत हसत विचारला.

ओप्राच्या या प्रश्नाचे उत्तर देत ऐश्वर्या म्हणाली, हो भारतीय महिला सुंदर दिसण्यासाठी पैसे खर्च करतात. पण हे तेव्हापासून सुरु झाले जेव्हा भारतात मेट्रोमॉनिल्स आले. जेव्हा लग्नासाठी जाहीराती दिल्या जाऊ लागल्या तेव्हा मुली दिसायला देखण्या असाव्या, असे लिहिण्यात येत होते. त्यामुळे लोकांना असे वाटत होते, की लग्न होण्यासाठी चांगले दिसणे गरजेचे आहे.

तसेच भारतीय महिलांच्या सेक्सुऍलिटीबद्दल ऐश्वर्या तिला म्हणाली, भारतात आज सुद्धा सार्वजनिक ठिकाणी शरिर संबंध ठेवत नाही. कारण भारतात आज पण असे मानले जाते की शरीर सुख हे फक्त शरीराशीच संबंधित नसते, तर ते भावनांशी जुळलेले असते. ऐश्वर्याचे हे उत्तर ऐकून मात्र ओप्राची बोलती बंद झाली होती.

तसेच ऐश्वर्याने जेव्हा इंग्लिशमध्ये बोलण्यास सुरुवात केली होती, तेव्हा सुद्धा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता, कारण ओप्रा यांचा असा गैरसमज होता, की भारतीय लोकांना चांगले इंग्लिश बोलता येत नाही.

ओप्रा त्यावेळी ऐश्वर्याशी इतकी प्रभावित झाली होती, की तिने चालू शोमध्ये ऐश्वर्याकडून साडी घालून घेतली आणि स्टेजवर चालून दाखवले. तेव्हा ऐश्वर्या फक्त ३० वर्षांचीच होती, त्यामुळे तिच्या प्रत्येक उत्तरांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.