..त्यावेळी रक्ताने लाल होऊनही ऐश्वर्याने शुटींग पुर्ण केले होते, वाचा पुर्ण किस्सा

0

जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर संघर्षही मोठा करावा लागतो. यश संपादन करायचे असेल तर त्यासाठी अनेक त्याग करावे लागतात. बॉलीवूडमधील अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनीही आपले नाव कमावण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला आहे. त्यातीलच एक मोठे नाव म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन.

तिने हॉलिवूडमध्येही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्याने जेव्हा मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता तेव्हा ती चर्चेत आली होती. त्यानंतर तिला बॉलिवूडमधून चित्रपटांसाठी ऑफर येऊ लागल्या होत्या. आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तिला खुप संघर्ष करावा लागला होता.

सगळ्यांनाच माहिती आहे की हम दिल दे चुके सनम चित्रपटापासून ऐश्वर्या चर्चेत आली होती. आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्याच्या आयुष्यातील काही भन्नाट गोष्टी सांगणार आहोत. साल २००२ मध्ये देवदास चित्रपट प्रदर्शित झाला होता. ऐश्वर्या राय आणि माधुरी दिक्षीतने त्यामध्ये एकत्र काम केले होते.

हा चित्रपट खुप हिट झाला होता. त्यावेळी शाहरूख खानही त्या चित्रपटामुळे खुप चर्चेत आला होता. त्यातल्या त्यात ऐश्वर्या आणि माधुरी दिक्षीतला एकत्र डान्स करताना पाहून सगळ्यांच्याच डोळ्याचे पारणे फिटले होते. आजही हे गाणे अनेकांच्या आवडीचे गाणे आहे आणि अनेक डान्सर या गाण्यावर डान्स करताना आपल्याला दिसतील.

त्यामधील डोला रे डोला या गाण्याला हिट करण्यासाठी खुप मोठा सेट उभारण्यात आला होता. त्यासाठी खुप मोठे युनिट तयार करण्यात आले होते. दोन्ही अभिनेत्रींच्या सगळ्या गोष्टींची बारकाईने काळजी घेण्यात आली होती. माधुरी त्यावेळी डान्सिंग डीवा म्हणून प्रसिद्ध झाली होती.

तिच्यासोबत ऐश्वर्याला डान्स करायचा होता. माधुरीसोबत डान्स करण्यासाठी सर्वच अभिनेत्र्या खुप उत्सुक असायच्या. त्यावेळी ऐश्वर्याने आपल्या डान्समध्ये कसलीही कमी ठेवली नव्हती. तिने डान्समध्ये माधुरीला टक्कर दिली होती. पण खुप कमी लोकांना माहिती आहे की या गाण्याच्यावेळी ऐश्वर्याचा अपघात झाला होता.

तिला घातलेली ज्वेलरी खुप जड होती. त्यामुळे नाचताना तिच्या कानाला ज्वेलरीमुळे दुखापत झाली होती. त्यानंतर तिच्या कानातून खुप रक्त येत होतं. परंतु ऐश्वर्याने कोणतीही तक्रार केली नाही आणि पुर्ण शुटींग पुर्ण केले होते. शुट संपल्यानंतर युनिट मेंमर्सला याची माहिती मिळाली.

त्यानंतर त्यांनी ऐश्वर्यावर उपचार केले होते. अशा परिस्थितीतही तिने केलेल्या डान्सचे कौतुक सगळ्यांनाच होते. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. तिने अनेक हिट चित्रपट दिले. जरी आज ऐश्वर्या अभिनयापासून दूर झाली असली तरी तिची क्रेझ जराही कमी झालेली नाही. आजही तिचे चाहते अनेक आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.