आदिदास आणि पुमामुळे ‘या’ शहराचे झाले होते दोन भाग; एकाचा समर्थक दुसऱ्याशी संबंध सुद्धा ठेवायचा नाही

0

 

आज जगभरात पुमा आणि आदिदासने स्वता: एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जेव्हा पण स्पोर्ट्स शुज म्हटलं तर पुमा आणि आदिदासचेच शुज समोर येतात. आज या दोन्ही ब्रॅंडला एकमेकांचे स्पर्धक म्हटले जाते पण तुम्हाला माहितीये या दोन्ही ब्रँडचे मालक सख्खे भाऊ होते.

चला तर मग जाणून घेऊया नक्की काय झाले होत्या त्या दोन भावांमध्ये आणि कसा झाला पुमा आणि आदिदास या दोन कंपन्यांची सुरुवात. अडॉल्फ डॅसलर आणि रुडॉल्फ डॅसलर असे या दोन भावांचे नाव होते. त्यांच्या वादविवादातूनच पुमा आणि आदिदास हे दोन ब्रँडची सुरुवात झाली होती.

अडॉल्फ आणि रुडॉल्फ यांचा जन्म जर्मनीतल्या एका गरीब कुटूंबात झाला होता. त्यांचे वडिल बुट बनवण्याचा व्यवसाय करायचे. अडॉल्फने बुट कसे बनवता हे खुप लवकर शिकून घेतले, कारण परिस्थीती गरीबीची होती.

१९२० साली दोन्ही भावांनी मिळून त्यांच्या आईच्या लाँड्रीमध्ये बुट बनवण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. अडॉल्फ हा वेगवेगळे प्रयोग करत रहायचा, तर रुडॉल्फ मार्केटींगची बाजू सांभाळायचा. त्या कंपनीचे नाव स्पोर्टस फॅब्रिक गेब्रुडर डॅसलर असे होते.

मैदानात खेळाडू खेळत असतील तर त्यांची कामगिरी उंचावता आली पाहिजे, असे आपण बुट बनवले पाहिजे अशी इच्छा अडॉल्फची होती. त्याच्या वेगवेगळ्या कल्पनांनी कंपनीला चांगलाच फायदा होत होता.

त्यांच्या कंपनीला खरी प्रसिद्धी १९३६ मध्ये मिळाली. जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकावणारा अमेरिकेचा धावपटू जेसी ओवन्स त्यांच्या कंपनीचा ब्रँड अँबेसिडर ठरला. त्यांच्या कंपनीला हिटलरच्या युथ क्लबसाठी बुट बनवण्याचे काम मिळाले. दोन्ही भाऊ नाझी पक्षाचे सदस्यही बनले.

दुसऱ्या महायुद्ध जेव्हा सुरु झाले, तेव्हा अनेकजण युद्धात सैनिक म्हणून भरती झाले. त्यामुळे जेव्हा युद्ध सुरु झाले तेव्हा जवळपास २ लाख जोड्यांची विक्री झाली. पण जेव्हा त्यांच्या बायकांचा या कंपनीत हस्तक्षेप होऊ लागला, तेव्हा दोन्ही भावंडांमध्ये वादाला सुरुवात झाली.

१९४० मध्ये अडॉल्फ सैन्यात भरती झाला, पण कंपनीत त्याची गरज पडू लागल्याने तो पुन्हा परत आला. रुडॉल्फ पहिल्या महायुद्धात सहभागी झाला होता, त्याला पुन्हा सैन्यात भरती व्हावं लागलं.

रुडॉल्फ वाटले की आपण सैन्यात जातोय त्याला जबाबदार अडॉल्फ आहे. त्याने हे सर्व कंपनीचा ताबा मिळवण्यासाठी केले आहे, असे रुडॉल्फला वाटले. त्यामुळे तो सैन्यातुन तो पळून आला पण पोलिसांनी त्याला पकडून नेले. युद्ध संपेपर्यत तो जेलमध्येच होता. त्यानंतर पण नाझीशी संबंध असल्याने त्याला आणखी एक वर्ष त्याला जेलमध्येच राहावे लागले.

जेलमधून आल्यानंतर त्यांच्यातले वाद पेटतच गेले. त्यामुळे १९४८ साली कंपनीचे दोन भाग करण्यात आले. कंपनीतल्या कामगारांचे आणि त्यांच्या सर्व संपतीचे विभाजन झाले. अडॉल्फला कंपनीचा एक तृतीअंश भाग मिळाला, तर रुडॉल्फने स्वता:ची कंपनी सुरु केली.

अडॉल्पने त्याच्या कंपनीचे नाव आदिदास ठेवले. तर रुडॉल्फने त्याच्या कंपनीचे रुडा असे ठेवले, पण ते खास लोकांनी खास पटले नाही त्यामुळे त्याने आपल्या कंपनीचे नाव पुमा असे ठेवले.

Herzogenaurach शहरात जी ओरा नदीच्या दक्षिणेला पुमा स्थापन झाली, तर नदिच्या उत्तरेला आदिदासची सुरुवात झाली. या दोन कंपन्यामुंळे शहरांची सुद्धा दोन भागात विभागणी झाली होती.

या शहराला झुकलेल्या मानांचे शहर म्हणून ओळखले जात होते, कारण शहरातला प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या पायात कोणते बुट घालतोय याकडे लक्ष द्यायचा. यामुळे तिथल्या सामाजिक जीवनावरही त्याचा मोठा परिणाम झाला होता.

तिथल्या प्रत्येक घरातील एखादी व्यक्ती तरी पुमा किंवा आदिदासच्या कंपनीत काम करत असे. आदिदाचा समर्थक कधीच पुमा वापरणाऱ्याशी संबंध नाही ठेवायचा. शहरातील हा वाद दोन्ही भाऊ जीवंत असे पर्यंत होता. पुढच्या पिढीच्या हातात हा कंपन्या गेल्यानंतर या संपला.

Leave A Reply

Your email address will not be published.