सिनेमाचा ‘वस्ताद पाटील’ काळाच्या पडद्याआड, जाणून घ्या रवी पटवर्धन यांच्याबद्दल…

0

 

मराठी सिनेसृष्टीतले जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे रविवारी निधन झाले आहे. पटवर्धन यांचे निधन वयाच्या ८३ व्यावर्षी वृद्धपकाळाने झाले आहे. त्यामुळे पूर्ण नाटकासह सिनेमासृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

रवी पटवर्धन यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३७ ला झाला होता. मराठी नाट्यसृष्टी आणि मराठी सिनेमासृष्टी नंतर त्यांनी छोट्या पडदा देखील गाजवला आहे. भारग्रस्त व्यक्तिमत्वाला शोभतील अशा मिश्या आणि आपल्या खास आवाजामुळे त्यांना नेहमीच गावचा पाटील, पोलीस, न्यायाधीश, खलयानायक अशा भूमिका मिळाल्या.

आपल्या आयुष्यात रवी पटवर्धन यांनी १५० हुन अधिक नाटके, तर २०० हुन अधिक चित्रपटात त्यांनी आपल्या वेगवेगळ्या भूमिका गाजवल्या आहेत. ‘अगं बाई सासूबाई’ ही त्यांच्या आयुष्यातली शेवटची मालिका ठरली.

१९७४ मध्ये रवी पटवर्धन यांनी आरण्यक नावाचे नाटक केले होते. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी याच नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती.

रवी पटवर्धन मुंबईच्या रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. ते ठाण्यात राहायचे. नोकरीच्या कालावधीत त्यांना सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापनाचाच्या सहकार्यामुळे त्यांना नाटकाची हौस जपता आली होती.

अपराध मीच केला, आनंद (बाबू मोशाय), आरण्यक (धृतराष्ट्र),
एकच प्याला (सुधाकर), कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान), कोंडी (मेयर), जबरदस्त (पोलीस कमिशनर), प्रेमकहाणी (मुकुंदा), बेकेट (बेकेट), भाऊबंदकी, मला काही सांगायचंय (बाप्पाजी), मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस), विकत घेतला न्याय (सिटी पोलीस ऑफिसर) अशी त्यांची गाजलेली नाटके आहे.

तसेच अंकुश (हिंदी), अशा असाव्या सुना, उंबरठा, दयानिधी संत भगवान बाबा, ज्योतिबा फुले, झॉंझर (हिंदी), तक्षक (हिंदी), तेजाब (हिंदी), नरसिंह (हिंदी), प्रतिघात (हिंदी), बिनकामाचा नवरा, सिंहासन, हमला (हिंदी), हरी ओम विठ्ठला हे रवी पटवर्धन यांचे गाजलेले चित्रपट आहे.

वय वाढल्यावर येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर पण रवी पटवर्धन यांनी विजय मिळवला होता. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले होते.

या शास्त्राचा वापर करून त्यांनी अनेक व्याधींवर मात केली होती. शिवाय आत्मविश्वास हरवलेली व्यक्ती आणि व्यधग्रस्तांवरही त्यांनी या शास्त्राचा उपयोग केला होता.

विशेष म्हणजे वयाच्या ८० व्या वर्षी भगवतगीतेचे ७०० श्लोक त्यांनी पाठ केले होते. तसेच वयाच्या ८० व्या वर्षी ते शृंगेरी मठाच्या परीक्षेत बसले होते. यावेळी शंकराचार्य यांनी घेतलेल्या परीक्षेत ते पहिले आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.