इंजिनिअरिंगची नोकरी सोडून ३५ हजारांमध्ये सुरु केला व्यवसाय, आता आहे वर्षाला १ कोटींची उलाढाल

0

 

लॉकडाऊनमध्ये सर्वत्रच ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवले जात आहे. ऑलनाईन कोचिंग ही भविष्यात खुप महत्वाची ठरणार आहे, असे लक्षात येत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक आता नवनवीन विषय ऑनलाईन कोचिंगद्वारेच शिकवत आहे.

असे असताना आज आम्ही तुम्हाला अशा एका शिक्षकेची गोष्ट सांगणार आहोत, जी गेल्या पाच वर्षांपासून ऑनलाईन कोचिंगने विद्यार्थ्यांना शिकवत आहे. इतकेच नाही तर या व्यवसायातून ती वर्षाला १ करोडची उलाढाल करत आहे.

केरळमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव आशा बिनीश असे आहे. आशा या ऑनलाईन स्पर्धा परिक्षांच्या कोचिंग क्लासेस घेतात. एक दोन विद्यार्थ्यांपासून सुरु झालेला हा प्रवास आज पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला आहे. तसेच त्यांच्या युट्युब चॅनेलचे अडीच लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे.

३४ वर्षांची आशा ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. २००६ मध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी घरीच राहून मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि नोकरी सोडली. पण त्यांना घरी बसून काही तरी वेगळे करायचे होते.

अशातच त्यांनी घरी राहून एक व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड केले आणि युट्युबवर अपलोड केले. सुरुवातीच्या दोन व्हिडिओंना जास्त रिस्पोंस नाही मिळाला, पण तिसऱ्या व्हिडिओला चांगलाच रिस्पोंस मिळाला. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली.

अशात त्यांना कोणीतरी ऑनलाईन कोचिंग सुरु करण्यासाठी सांगितले. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन कोचिंगला सुरुवात केली. स्पर्धा परिक्षांची ऑनलाईन कोचिंग ही विद्यार्थ्यांना सोईस्कर आणि कमी खर्चिक असते, त्यामुळे त्यांनी स्पर्धा परिक्षांच्या ऑनलाईन कोचिंगला सुरुवात केली.

२०१६ मध्ये त्यांनी कॉम्पिटेटिव क्रॅकर नावाने एक क्लास सुरु केली. लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन मिळून त्यांना ३५ हजार रुपये खर्च आला. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी एर्नाकूलममध्ये भाड्याने जागा घेईन कोचिंग सुरु केली.

सुरुवातीला वर्षभर ऑनलाईन व्हिडिओ एडिटींग, अपलोडींग, मार्केटींगची कामे स्वत:च केली, त्यानंतर त्यांच्या पतीने नोकरी सोडली आणि आपल्या पत्नीच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. आज आशा सोबत २५ लोकांची टीम काम करत आहे.

लॉकडाऊनमध्ये त्यांनी वेगवेगळे क्लास लाँच केले आहे. आता त्यांची ७० टक्के कमाई ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुनच होत आहे. आशा त्यांच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ लेक्चर, ऑनलाईन कटेंट, तसेच परिक्षा, अशा सुविधा पुरवतात. अशाप्रकारे त्याच्या कामाचा वार्षिक उलाढाल १ कोटींची आहे.

युपीएससी, केपीएससी तसेच बँकेच्या परिक्षा यांसारख्या परिक्षांच्या कोचिंग त्या घेतात, विशेष म्हणजे आशा घर चालवण्यासोबत शिकवण्याचे काम करत आहे. त्यामुळे आता अनेकांसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.