मुर्ती लहान किर्ती महान! अवघ्या ९ वर्षांचा मुलगा बागकामातून कमावतोय हजारो रूपये

0

असे म्हणतात की लहान मुलांना लहान वयात खेळण्यातून आणि अभ्यासातूनच वेळ मिळत नाही. पण एक मुलगा यासाठी अपवाद ठरला आहे. कारण त्या मुलाने ९ वर्षांच्या वयातच पैसै कमवायला सुरूवात केली आहे.

त्याच्या या कामामुळे त्याचे पालकही त्याच्यावर खुप खुश आहेत. आता तुम्ही म्हणाल त्याने असे काय केले आहे की इतक्या लहान वयात त्याने कमाई करण्यास सुरूवात केली आहे. तर ९ वर्षीय वियानने बागकामातून हजारो रूपयांची कमाई केली आहे.

तो घरातच बागकाम करत आहे. त्याने सेंद्रीय पद्धतीने फळे आणि भाज्या पिकवल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला त्याचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत. आपल्या आईमुळे त्याला झाडांची आवड निर्माण झाली होती.

तो तेव्हा तीनच वर्षांचा होता आणि आपल्या आईला तो बागकामात मदत करायचा. काही वर्षात तो त्यामध्ये चांगला पारंगत झाला आणि त्यातून त्याला कमाई होईल हे त्याला ठाऊकही नव्हते.

त्याची आई अविशा यांनी सांगितले की आम्ही त्याला लहानपणापासूनच वनस्पती आणि निसर्ग याबद्दल माहिती सांगण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे त्याला झाडांची आवड निर्माण झाली होती. बागकामाच्या या छंदाला त्याने व्यवसायात बदलले आणि स्टार्टअपला सुरूवात केली.

त्याच्या बागेत तो इतर भाज्यांसोबत टोमॅटो, भोपळा, वांगे इ. भाज्या लावतो. याच्या माध्यमातून तो लोकांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या पुरवतो. यातून त्याला महिन्याला दहा हजार रूपये उत्पन्न मिळत आहे.

वियानने भाज्यांबरोबर त्याच्या बागेत फळेही लावली आहेत. त्याच्या बागेत सिताफळ, पेरू आणि पपईची झाडे आहेत. वियान स्वता या झाडांची काळजी घेतो. दुपारी तो आजीसोबत बागेत वेळ घालवतो आणि झाडांना पाणी देण्याचे काम करतो.

Leave A Reply

Your email address will not be published.