नातवाची नोकरी गेली म्हणून ७७ वर्षांच्या आजींनी सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला कमावतात ३ लाख

0

आज आम्ही अशा एका आजींचा प्रवास सांगणार आहोत ज्या ७७ व्या वर्षी महिन्याला ३ लाख रूपये कमावतात. त्यांचा दिवस सकाळी साडेपाच वाजताच सुरू होतो. त्या आपली सुनबाई राजश्री आणि नातासाठी चहा आणि नाश्ता बनवतात आणि नग वृत्तपत्र वाचतात.

यानंतर त्यांचे स्वताचे नाश्त्याचे एक दुकान आहे तिथे जातात ज्याचे नाव आहे गुज्जू बेन ना नास्ता. या नाश्ताच्या दुकानात आलेल्या मुंबईतल्या लोकांच्या त्या ऑर्डर पुर्ण करून देतात आणि अनेक स्वादिष्ट्य व्यंजने बनवतात.

त्यांच्या हाताला वेगळीच चव आहे. आपल्या सुनेची आणि आणखी दोन जणांची मदत घेऊन त्या दुपारपर्यंत या सगळ्या ऑर्डर्स पुर्ण करतात. दुपारपर्यंत सगळ्यांपर्यंत जेवण पोहोचलेले असते.

भारतातील अनेक महिला घरच्या घरी जेवण बनवून ऑर्डर घेत असतात पण या आजींची पद्धतच वेगळी आहे. उर्मिला आजी आपल्या वेगळ्या पद्धतीमुळे खुप फेमस आहेत. उर्मिला यांनी त्यांच्या आयुष्यातील त्रास आणि संघर्ष कमी वयाच्या ७७ व्या वर्षी हा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता.

लग्नानंतर त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. कारण इमारत कोलळल्याने त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यु झाला होता. यानंतर काही वर्षातच त्यांच्या दोन्ही मुलांचाही मृत्यु झाला.

त्यांच्या एका मुलाला ब्रेन ट्युमर झाला होता आणि एका मुलाला हृद्यविकाराचा झटका आला होता. अशात उर्मिला यांच्याकडे आपलंस म्हणण्यासारखं फक्त त्यांचा नातू हर्ष आणि त्यांची सुनच राहिली होती.

हर्षने २०१२ मध्ये एमबीए पुर्ण केलं आणि भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ओमान मंत्रालयासोबत काम केलं आहे. २०१४ मध्ये त्याने वाणिज्य दुतावास आणि व्यापाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी आपली नोकरी सोडली होती.

२०१९ मध्ये एका दुर्घटनेत हर्षला आपला वरचा ओठ गमवावा लागला होता. त्यानंतर हर्ष घराच्या बाहेरसुद्धा निघत नव्हता. तो डिप्रेशनमध्ये गेला होता. अशा परिस्थितीत घरची परिस्थिती खुप बिकट झाली होती.

त्यानंतर आजींना हर्षला आधार दिला. मागच्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन झाले होते तेव्हा हर्ष आपल्या आजींसोबतच होता. तेव्हा आजींनी गुजराती लोणचे बनवले होते. आजी गुजराती लोणचं खुप चांगल बनवतात.

हर्षने आपल्या आजीने बनवलेला लोणच्याचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आणि त्याला खुप चांगला प्रतिसाद मिळाला होता. हर्ष म्हणाला की जेव्हा मागणी वाढली तेव्हा आम्ही प्रोडक्टसही वाढवले.

त्याच्यासोबत गरम नाश्ताही आम्ही द्यायला सुरूवात केली. हळूहळू व्यवसाय वाढत गेला आणि आम्ही गुज्जू बेन ना नास्ता या नावाने दुकानही सुरू केले. या नावाच अर्थ होतो की गुजराती बहिणीच्या हातचा नाश्ता.

लोक दुकानात येतात किंवा ऑनलाईन नाश्त्याची ऑर्डर देतात. गरम नाश्त्याची ऑर्डर केवळ मुंबईकरांची घेतली जाते असे त्यांनी सांगितले आहे. चिप्स, लोणचं, खाकरा, कुकीज हे पदार्थ आम्ही बाहेर विकतो.

हे सर्व पदार्थ उर्मिला आजी स्वता बनवतात. हर्ष मार्केटिंगचे काम पाहतो. याशिवाय त्यांच्या हाताखाली दोन महिला आणि तीन मुले काम करतात. उर्मिला यांच्या दोन सुनाही त्यांना या कामात मदत करतात.

त्यातून त्यांना प्रत्येक महिन्याला दोन ते तीन लाखांची कमाई होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.