मेंदुच्या आजारामुळे आहे त्रस्त, म्हणून स्वता: लिंबूपाणी विकून जमा करतेय ऑपरेशनसाठी पैसे

0

 

प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी संकटांचा सामना करावाच लागतो. पण तुमची संकटांवर मात करण्याची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही त्यावर नक्कीच मात करु शकतात. अशात एक सात वर्षांची मुलगी सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे, पण तुम्ही तिची जिद्दीची गोष्ट जाणून तुम्ही पण तिला सलाम ठोकाल.

अमेरिकेत राहणाऱ्या या सात वर्षांची मुलगी तिच्या स्वता:च्या सर्जरीसाठी लिंबु पाणी विकून पैसे जमा करत आहे. लीजा स्कॉट असे या लहान मुलीचे नाव असून तिची काही दिवसातच मेंदूची सर्जरी होणार आहे.
तिच्या कुटुंबावर पैशांचा ताण येऊ नये म्हणून ती स्वता: पैसे जमा करत असल्याने जगभरात तिचे कौतुक केले जात आहे. लीजा पैसे जमवण्यासाठी तिच्याच आईच्या बेकरीमध्ये ती काम करत आहे.

लीजाच्या आईची सेवेज नावाची बेकरी असून लीजा तिथे लिंबुपाणीचा स्टॉल लावला आहे. तिथे लीजा लिंबूपाणी विकून पैसे मिळवत आहे. तिच्या मेंदूमध्ये काही भागांमध्ये अडचण आली असून लीजाला फिटचा त्रास होत आहे.

एक महिन्यापुर्वी लीजा अचानक फिट येऊन बेशुद्ध पडली होती. जेव्हा तिला दवाखान्याच दाखवण्यात आले तेव्हा असे लक्षात आले की तिला मेंदूत गंभीर समस्या आहे.

डॉक्टरांना जो मेलफॉर्मेश लीजाच्या मेंदूत मिळाल्या आहे, तो साधारणत: मेंदुमध्ये एकाच ठिकाणी असतो, पण लीजाच्या मेंदूमध्ये तो तीन ठिकाणी आढळून आला आहे. त्यामुळे तिचे लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागणार आहे.

इतके मोठे संकट आले असतानाही लीजाने हार मानली नाहीये आणि ती स्वता: काम करुन तिच्या सर्जरीसाठी पैसे जमवत असल्याने सगळीकडूनच तिचे कौतूक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.