इंटरनेटचा वापर करून हा चिमुकला महिन्याला कमावतोय लाखो रूपये, वाचा कसे…

0

आज आम्ही अशा एक चिमुकल्याबद्दल सांगणार आहोत जो इंटरनेटचा वापर करून लाखो रूपये कमवत आहे. आजकालच्या सहा वर्षांच्या पोरांना इंटरनेट कळत नाही तर हा सहा वर्षांचा चिमुकला त्याचाच वापर करून बक्कळ रूपये कमवत आहे.

तुमचा मुलगा ६ वर्षांचा असताना काय करत होता किंवा काय करतो? असा सवाल जर आम्ही तुम्हाला केला तर तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का? पण हा लेख तुम्हाला विचार करायला लावणार आहे.

तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही पण हे खरे आहे. निहाल राज असे त्या मुलाचे नाव असून तो मुळचा कोच्चीचा राहणारा आहे. तुम्हाला माहितच असेल की युट्यूब हा खुप मोठा सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहे.

त्यातून बरेच लोक खुप पैसा कमावतात. पण त्यातून पैसै कमावणे सोपी गोष्ट नाही. बरेच लोक युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करत असतात पण सगळ्यांनाच पैसै मिळत नाहीत. ज्याच्या कंटेंटमध्ये दम असतो तोच त्यावरून पैसै कमवू शकतो.

काही लोक थोड्या दिवस त्यांच्या चॅनलवर व्हिडीओ टाकतात आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला युट्यूबवरून पैसै कमवायचे असतील तर तुम्हाला थोडा वेळ लागेल. राज नावाचा हा चिमुकाल युट्यूबवर स्टार आहे.

भारतातील सर्वात लहान यशस्वी युट्यूबरमध्ये त्याचे नाव आहे. निहाल हा शेफ आहे. तो रेसिपी बनवायला शिकतो आणि त्याचे व्हिडीओज युट्यूबवर अपलोड करतो. त्याचे हे व्हिडीओज लाखो लोक पाहत असतात.

त्यातून त्याला लाखोंची कमाई होते. तुम्ही फक्त युट्यूब नाही तर फेसबूकवरूनही पैसै कमावू शकता. या लहान मुलाशी फेसबूकने करार केला आहे त्यामुळे त्याला त्यातूनही पैसै मिळतात. या करारानुसार त्याला २ हजार डॉलर्स म्हणजे तब्बल १ लाख ३० हजार रुपये मिळतात.

निहाल राज सध्या जगभरात प्रसिद्ध आहे. त्याला अनेक टीव्ही शोजमध्ये बोलविण्यात येते. त्याची मुलाखत घेतली जाते. एका शोमध्ये त्याने पुट्टू नावाचा ब्रेकफस्ट बनवला होता. त्यामुळे त्याला आता पुट्टू कुट्टी म्हणून लोक ओळखतात. तुम्हीही अशा प्रकार युट्यूब चॅनल खोलून बक्कळ पैसा कमावू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.