२६ वर्षाच्या वयात ५७२ भिकाऱ्यांना दिली नोकरी एकदा वाचाच या पठ्ठ्याची गोष्ट..

0

आपण अनेकदा भिकाऱ्यांना रेल्वे स्टेशन, मंदिरबाहेर, फूटपाथवर भीक मागताना बघतो. काही वेळा आपण पैसे किंवा त्यांना खायला देतो,पण बऱ्याच वेळा त्यांना काही लोक अपमानित करत असतात.

अशात काही लोक असे पण असतात जे भिकाऱ्यांचे आयुष्य बद्दलवण्याचे काम करत असतात. आजची ही गोष्ट एका अशाच माणसाची आहे ज्याने आजपर्यंत अनेक भिकाऱ्यांना काम मिळवून दिले आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून दिली आहे. त्या तरुणाचे नाव पी. नवीन कुमार असे आहे.

नवीन कुमार यांनी एखाद्या भिकाऱ्याला खायला देण्यापेक्षा त्याचे आयुष्य बदलता यावे यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहे. २०१४ पासून त्यांनी हे काम सुरू केले होते. नवीन कुमार यांनी आजपर्यंत ५ हजार लोकांची मदत केली आहे, तर ५७२ लोकांना रोजगार त्यांनी मिळवून दिला आहे.

हे काम सुरू करण्यामागे पण छोटीशी गोष्ट आहे. नवीन कुमार हे एकदा मंदिरात गेले होते, तेव्हा ते बाहेर येत असताना एक आजी त्यांना दिसली त्या भीक मागत होत्या. नवीन कुमार यांनी विचारपूस केली असता त्यांना असे कळाले की आजींना त्यांच्या नातेवाईकांनी सोडून दिले आहे, त्यांना घरी वापस जाण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा नवीनने त्या आजीला पैसे दिले.

काही दिवसांनी त्यांना एक व्यक्ती मिळाला जो भीक मागत होता, ज्याला प्रवासासाठी पैसे पाहिजे होते, तेव्हा नवीन यांनी त्याला पैसे दिले. मात्र काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी नवीन यांना तो भिकारी दिसला. त्यांनी भिकाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला असे कळले की त्या भिकाऱ्याचे नाव राजशेखर आहे.

नवीन यांनी राजशेखरला जेव्हा आणखी विचारपूस केली तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि तो तिथून निघून गेला. जवळपास २२ दिवस नवीन त्याच्या मागे फिरत राहिले. तेव्हा शेवटी राजशेखरने त्याची हकीकत सांगितली.

राजशेखरने सांगितले, मी एक व्यसनी आहे, मला दारूसाठी पैसे लागतात, मी आयुष्याला खूप कंटाळलो आहे. त्यामुळे मी भीक मागणे सुरू केले. तेव्हापासून नवीन यांनी भिकाऱ्यांना नोकरी मिळवून देण्याचे काम सुरू केले.

त्यांनी राजशेखरला एका रेसिडेन्सीमध्ये कामाला लावून दिले. भिकारीमुक्त भारत बनवण्यासाठी Atchayam Trust बनवले आहे. या कामासोबतच त्याने आपले शिक्षण पण सुरूच ठेवले.

२०१६ मध्ये नवीन ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते, त्याच कॉलेजमध्ये त्यांना लेक्चररची नोकरी मिळाली. आपल्याला मिळालेल्या पगाराने तसेच मिळालेल्या डोनेशन आणि १८ जिल्ह्यांमधल्या ४०० वॉलंटियर्सच्या मदतीने आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त भिकाऱ्यांना त्यांनी नोकरी मिळवून दिली आहे, तर ५ हजार पेक्षा जास्त भिकाऱ्यांना त्यांनी मदत केली आहे.

बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मंदिर आणि अन्य ठिकाणी काम करणाऱ्या रिक्षा चालक, टॅक्सी चालकांच्या मदतीने नवीन यांची टीम भिकाऱ्यांना शोधत असते आणि त्यांची मदत करत असते. नवीन कुमार यांना या कामासाठी २०१८ मध्ये नेशनल युथ अवॉर्ड आणि २०१९ मध्ये स्टेट युथ अवॉर्डने सन्मानित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.