…आणि २० एकरची शेती पोहोचली ७०० एकरवर, हातातली नोकरी सोडून केली शेती

0

त्यांना चांगली नोकरी होती पगारही होता पण त्यांना शेती करण्याची ओढ निर्माण झाली त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला आपल्या मालकीच्या शेतात म्हणजे २० एकरमध्ये अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली होती.

त्यात त्यांना यश मिळाले आणि पुढेही मिळत गेले त्यामुळे आता त्यांनी ७०० एकरमध्ये विविध प्रकारच्या फळांच्या बाग पिकवल्या आहेत. सध्या त्यांच्या शेतात १२५ प्रकारची वेगवेगळळी फळ पिकत आहेत.

आज आम्ही या शेतकऱ्याची यशोगाथा खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या शेतकऱ्याचे नाव आहे भालचंद्र ठाकूर. त्यांचे वडील पंजाबराव देशमुख हे कृषी विद्यापीठात संशोधक होते. त्यामुळे आपल्या वडिलांना वाहून5 त्यांनाही शेतीची आवड निर्माण झाली.

भालचंद्र ठाकूर हे उच्चशिक्षित होते आणि त्यांना चांगली नोकरीही होती. पण त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० एकरात आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली.

त्यासाठी त्यांनी अनेक कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच त्यांनी विदेशात जाऊन वेगवेगळे तंत्रज्ञान आत्मसात केले. यातून त्यांनी आधुनिक शेती केली आणि त्यांना यश आले. २० एकरपासून सुरू केलेला त्यांचा प्रवास आज ७०० एकरवर पसरला आहे.

त्यांनी अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी ठिबक सिंचन, शेडनेट, पॉलिहाऊस, शेततळे अशा विविध आधुनिक पद्धतींचा वापर केला आहे. त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळांची शेती करण्याचा निर्णय घेतला.

ड्रॅगन, पमोली, लीची, पेरू, बोराचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. त्यांना अनेक बाहेरच्या देशातून मागणी आहे. त्यांच्या मुलानेही विदेशात शिक्षण घेतलं आहे पण सध्या तो ही आपल्या वडिलांना शेतीत मदत करतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.