दोन मित्र, एकाला हात नाही तर एकाला डोळे, दोघांनी मिळून १० वर्षात लावली १० हजार झाडे

0

असे म्हणतात की जर माणसाने काही करण्याचे ठरवले तर जगातील अशी कोणतीच शक्ती नाही जी त्याला रोखू शकते. आज आम्ही तुम्हाला दोन मित्रांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी इतिहास रचला आहे.

त्यांनी आपल्या दुष्काळग्रस्त गावात १० हजार झाडे लावली आहेत. चीनमधील शिनझुआंग गावाला जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की ऐकेकाळी या गावात दुष्काळ पडला होता

. काही वर्षांपुर्वी या ठिकाणी दगड मातीशिवाय काहीच नव्हते. पण दोन मित्रांनी या गावाला पुर्णपणे बदलून टाकले. आज या गावाला जर तुम्ही पाहिले तर सगळीकडे हिरवळ दिसेल.

आज आम्ही तुम्हाला याच दोन मित्रांची प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत ज्यांनी या गावाचे चित्रच बदलवून टाकले. आपल्या गावाला बदलवून टाकणाऱ्या या दोन मित्रांचे नाव जिया हैक्सिया आणि जिया वेंकी असे आहे.

दोघांचे वय ५३ आहे. सगळ्यात आश्चर्यकारक बाब ही आहे की हे दोघेही अपंग आहेत. जन्मताच जिया हेक्सिया याला आपल्या एका डोळ्यानी दिसत नव्हते. तर २००० मध्ये एका दुर्घटनेत त्यांनी आपला एक डोळा गमावला.

दुसरीकडे जिया वेंकी याने तीन वर्षांपुर्वी एका दुर्घटनेत आपले दोन्ही हात गमावले होते. दोघांनाही आपल्या अंपगत्वामुळे खुप अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना नोकरीही मिळाली नाही.

त्यानंतर त्यांचे लक्ष आपल्या दुष्काळग्रस्त गावाकडे गेले. दोघांनी ठरवले की आपण भाडेतत्वावर ८ एकर जमीन घ्यायची आणि त्यावर आपल्या पुढच्या पिढीसाठी झाडे लावायची. त्यांनी झाडे लावल्यानंतर गावात हिरवळ तर आलीच पण त्यामुळे गावात आलेल्या पुरामुळे गावाचे नुकसानही झाले नाही.

दोघांच्या कष्टाला पाहून चीनी सरकारने त्यांना आर्थिक मदत केली. त्यांनी त्यातून आणखी झाडे लावली. हेक्सिया हे आपल्या मित्राला म्हणजे वेंकीला आपल्या खांद्यावर घेऊन जायचे. हे दोघे अशा प्रकारे नदी पार करायचे.

हेक्सिया झाडावर चढायचे आणि नवीन झाडे लावण्यासाठी फांद्या कापायचे. दोघांनी अशा प्रकारे एकमेकांना मदत केली. त्यांनी असंभवला संभव करून दाखवले. ते दोन दशकापासून एकत्र आहेत आणि त्यांनी १० वर्षांत १० हजारांपेक्षा जास्त झाडे लावली आहेत.

अपंगत्व असताना त्यांनी जे काम केले आहे त्याची कहाणी जेव्हा दुसऱ्या लोकांना समजली तेव्हा त्यांना खुप सम्मान मिळाला. लोकांनी त्यांना आर्थिक मदत करण्याचे ठरवले. याचदरम्यान, चीनमधील फेमस न्यूज एजेंसी Xinhua news ने या बातमीची दखल घेतली आणि त्यांनी असे आश्वासन दिले आहे की ते हेक्सियाचे डोळ्यांचे ऑपरेशन करून त्यांना मदत करतील.

त्यासाठी हेल्थ केअर डिपार्टमेंट फ्रिमध्ये ऑपरेशन आणि उपचार करण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.