जबरदस्त! मंदिरातील फुलांपासून बनवतात अगरबत्ती आणि साबन, आता कमावतात तब्बल…

0

आज आम्ही तुम्हाला अशा दोन मैत्रिणींबद्दल सांगणार आहोत ज्या मंदिरातील फुले गोळा करतात आणि त्यापासून साबन आणि अगरबत्त्या बनवून विकतात. या दोघी हैदराबाद येथील रहिवासी आहेत. त्या दोघींचे नाव आहे माया विवेक आणि मिनल डालमिया.

तेलंगणा सरकारने फ्लोरल वेस्ट मॅनेजमेंटला पुर्ण प्रदेशात पसरवण्यासाठी या दोघींना निवडले आहे. दोन वर्षांपुर्वी त्यांनी हे काम सुरू केले होते. तेव्हा या दोघी आपल्या घरातील गार्डनमधील फुलांपासून खत बनवत असत.

त्यानंतर त्यांनी मंदिरातील फुले गोळा करण्यास सुरूवात केली. आता त्यांच्याकडे ४५ मंदिरातून फुले येत असतात. आता या कामातून त्यांनी गावातील महिलांनासुद्धा सशक्त बनवले आहे. माया म्हणाली की, मी १९ वर्षे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केले आहे.

एकदा तिला वाटले की आपण स्वताचे काहीतरी केले पाहिजे. मग तिने ती नोकरी सोडून दिली. मीनलसुद्धा आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावत होती. दोन्ही मैत्रिणींनी विचार केला की आपण काहीतरी पर्यावरणपुरक केले पाहिजे.

त्याचवेळी त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली. मायाने सांगितले की त्यांना वेस्ट फुलांपासून उत्पादन बनविण्याची कल्पना कानपूरमधील एका स्टार्टअपमुळे मिळाला होता. त्यांनी एका स्टार्टअपबद्दल वाचले होते ज्यामध्ये फुलांना रिसायकल केले जात होते.

तेव्हा मला जाणवले की प्रत्येक शहरात, प्रत्येक राज्यात मंदिरातील फुले जास्तकरून पाण्यात टाकून दिली जातात. त्यानंतर दोघींनी ठरवले की आपण या फुलांपासून व्यवसाय करायचा. मग त्यांनी ही फुले गोळा करण्यास सुरूवात केली.

मंदिरातील लोकांनीही त्यांना पाठिंबा दिला. पहिल्यांदा त्यांना जास्त फुले येत नव्हती पण आता त्यांना ४५ मंदिरातून फुले येतात. त्या फुलांपासून अनेक वस्तु बनवतात. जसे की साबन, अगरबत्ती, अत्तर आणि झाडांसाठी लागणारे खत.

त्यांच्या या कामाची दखल तेलंगणा सरकारनेही घेतली आहे. अनेक लोकांनी त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे. अनेक महिलांना त्यांच्यामुळे रोजगार मिळाला आहे. मंदिरातील वाया जाणाऱ्या फुलांचा चांगला वापर या दोन मैत्रिणींनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.