कोल्हापुरात दोन शेतकऱ्यांनी सुरू केली भारतातील पहिली पाण्यावर तरंगणारी शेती, आता कमावतात लाखो

0

आज आम्ही तुम्हाला अशा दोन शेतकऱ्यांची माहिती सांगणार आहोत ज्यांनी शेतीमध्ये एक नवा इतिहास घडवला आहे. कोल्हापुरात राहणाऱ्या या शेतकऱ्यांनी पाण्यावर तरंगणाऱ्या शेतीचा १०० कोटींचा प्रकल्प उभारला आहे. आज आम्ही तुम्हाला ही शेती कशी चालते हे सांगणार आहोत.

जर शेतीच्या बाबतीत कोल्हापुरचा विचार केला तर कोल्हापुरात शेती करण्यासाठी पुरेसे पाणी आहे. तरीही येथेही पाण्याचा पुन्हा वापर करून शेती करता येऊ शकते यावर तुमचा विश्वास बसणार नाही. राधानगरी धरणामुळे येथे पाण्याचा मुबलक पुरवठा होतो. त्यामुळे येथील शेतकरी पारंपारिक शेतकरी करतात.

येथे सगळीकडे उसाचे फड दिसतील आणि साखरेचे कारखाने दिसतील. त्याच ठिकाणी भारतातील पहिला ऍक्वेकेनिक म्हणजेच पाण्यावर तरंगत्या शेतीचा प्रयोग दोन शेतकऱ्यांनी केला आहे. हातकणंगले तालुक्यात २ एकरात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

मयंक गुप्ता आणि ललित झंवर या दोन शेतकऱ्यांनी एप्रिल २०१९ मध्ये या प्रयोगाला सुरूवात केली होती. भारतात कोठेच नसणाऱ्या या प्रोजेक्टला सुरु करण्यासाठी त्यांना खुप खर्च होणार होता. त्या दोघांनी मिळून जवळपास १० कोटी रूपये लागणार होते. त्यांनी या प्रकल्पाला लॅंडकास्ट असे नाव दिले आहे.

भारतात सगळेच पारंपारिक शेती करतात पण कोणीच शाश्वत शेती करत नाही. त्यामुळे त्यांनी नवीन काही करण्याची कल्पना डोक्यात आली होती. सरासरी जर विचार केला तर आपण शेतीला विहीरीचे किंवा तलावाचे पाणी देतो. पण त्यांनी वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर करून शेतीला दिले आहे.

येथे पिकवल्या जाणाऱ्या भाज्या बाहेरील देशातून आयात केल्या जात होत्या. आता त्या सगळ्या भाज्या येथेच उत्पादित केल्या जात आहेत. येथे अमेरिका, चीन, युरोपमधील भाज्या पिकवल्या जातात. तसेच मागणीनुसार मुंबई, बंगलोर, पुणे, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली येथे या भाज्या पाठवल्या जातात.

तसेच ग्रीन हाऊसमध्ये पाण्याच्या टॅंकरद्वारे मासे सोडले जातात. याच माशांच्या विष्ठेचा वापर खत म्हणून या भाज्यांना केला जातो. याच्याबद्दल बोलताना मयंक गुप्ता म्हणतात की, टाकाऊ पाण्यापासून ही शेती केली जाते. या शेतात बाहेरून आयात केल्या जाणाऱ्या महागड्या भाज्या पिकवल्या जातात.

जसे की चार्ल्ड, रशियाचे केळ, इटलीचा पालक अशा बऱ्याच भाज्या येथे पिकवल्या जातात. आणि प्रक्रिया केलेल्या पाण्यावर शेती केल्याने येथील भाज्या रसायण आणि विषमुक्त आहेत, असा विश्वासही त्यांनी दर्शवला आहे. पेरणी केल्यानंतर त्यांची देखभाल केली जाते. देखभालीच्या साधारण ६० दिवसांनी त्यांचे उत्पादन सुरू होते.

असच दोन किंवा चार महिन्यांनी या भाज्यांचे उत्पादन आम्हाला मिळते. पश्चिम आणि दक्षिण भारतातही त्यांचा भाजीपाला पुरवला जातो. आधी आठवड्यातून एकदा निर्यात केली जात होती आता रोज त्यांच्या भाज्यांची निर्यात केली जाते. तसेच त्याठिकाणी ३० टक्के महिला कामगार काम करतात असेही त्यांनी सांगितले आहे. तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.