मूर्ती लहान कीर्ती महान! डोळे बंद करून लिहिणाऱ्या मुलीने १२ व्या वर्षी केली १२ वीची परीक्षा पास

0

 

असे म्हणतात माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेला कोणती मर्यादा नसते, हे आता पून्हा एकदा सिद्ध झाले आहे. एका १३ वर्षीय मुलीला बीएला प्रवेश मिळाला आहे, तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे.

मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये राहणाऱ्या या मुलीचे नाव तनिष्का असे आहे. १३ वर्षाच्या तनिष्काला डीएवीवीमध्ये बीएला ऍडमिशन मिळाले आहे. तिने वयाच्या ११ व्या वर्षीच १० वीची परिक्षा पास केली होती.

तसेच १२ व्या वर्षी १२ वीची परिक्षा पास करुन स्वता:चे नाव एशिया बुक ऑफ अवॉर्डमध्ये नाव नोंदवले होते. तिचा बुक ऑफ अवॉर्डतर्फे सन्मान करण्यात आला होता.

तनिष्काला तक्षशिला परिसरातील स्कूल ऑफ लाँग लर्निंगमध्ये बीए सायकोलॉजीला ऍडमिशन मिळाले आहे. तनिष्का आपल्या आईसोबत राहते. काही काळापुर्वीच तिच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले होते.

तनिष्का डोळ्यांवर पट्टी बांधून सुद्धा लिहू शकते. तिच्या या गुणामुळेच तिला असामान्य विद्यार्थीनीचा पुरस्कार मिळाला आहे. तनिष्का जेव्हा अडीच वर्षांची होती तेव्हापासून तिने शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ८ व्या वर्षी तिने पाचवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले होते.

तसेच ११ व्यावर्षी तिने विशेष परवानगी घेऊन मालवा कन्या स्कूलमध्ये १० वीचा प्रायव्हेट फॉर्म भरून परिक्षा दिली होती. ती या परिक्षेत फर्स्ट क्लासने पास झाली होती. त्यानंतर १२ वीची परिक्षाही तिने अशीच पास केली होती. तिला पुढे बीए एलएलबी करायचे होते, पण त्यासाठी तिला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे तिने बीए सायकोलॉजीला ऍडमिशन घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.