महाराष्ट्रातील ११ शेतकऱ्यांनी सोशल मिडीयाचा वापर करून लॉकडाऊनमध्ये कमावले ६ कोटी

0

मार्च २०२० मध्ये, कोविडची प्रकरणे वाढत असताना देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. अचानक बंद पडण्याच्या घोषणेमुळे बर्‍याच लोकांना त्रास सहन करावा लागला आहे, अनेकांचे जीव थांबले आणि व्यवसायावरही परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील शेतकर्‍यांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती.

मुंबई, पुणे आणि इतर शेजारील शहरांमध्ये भाजीपाला आणि फळे विकणाऱ्या शेतकऱ्यांकडे भाज्यांचा साठा खुप होता पण त्याचे उत्पादन विकायला बाजारपेठ नव्हती. मग काही शेतकर्‍यांनी मिळून एक शेतकरी उत्पादक कंपनी कशी सुरू केली ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अहमदनगरच्या या शेतकऱ्यांची कहाणी सांगणार आहोत ज्यांनी या संकटाच्या काळात नुसत्या कल्पनांचाच प्रयोग केला नाही तर संकटाच्या काळाला संधीमध्ये त्याचा बदल केला. सुमारे डझनभर शेतकरी या भागाशी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जोडले गेले आणि एका योजनेंतर्गत एकत्र आले.

एप्रिल 2020 मध्ये, या सर्वांनी खरेदीदारांवर अवलंबून न राहता थेट ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे. जवळपास एक वर्षानंतर, २०२१ मध्ये हा समूह आता ४८० शेतकर्‍यांचा एक ग्रुप बनला आहे आणि या शेतकर्‍यांनी मिळून ‘किसानकनेक्ट’ नावाची कंपनी स्थापन केली आहे.

या कंपनीद्वारे ते त्यांचे उत्पादन थेट ग्राहकांना विकतात. थेट ग्राहकांशी जोडल्या गेलेल्या भाजीपाल्याच्या एक लाख बॉक्सची विक्री करण्याचे आणि ६.६ कोटी रूपयांचा नफा कमावण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. जुन्नर येथील ३९ वर्षीय शेतकरी आणि या गटाचे संस्थापक सदस्य मनीष मोरे म्हणाले की, परिसरातील शेतकरी सोशल मीडियावर आधीच एकमेकांच्या संपर्कात होते आणि यावर तोडगा काढण्याच्या विचारात होते.

अत्यावश्यक वस्तूसांठी जेव्हा लोकांच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा ११ शेतकर्‍यांनी मिळून डिजिटल बाजारपेठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. मनीष यांनी कृषी व व्यवसाय व्यवस्थापन (बीएससी) मध्ये पदवी संपादन केली आहे. बिगबाजार आणि रिलायन्ससारख्या रिटेल कंपन्यांसोबतही त्यांनी काम केले आहे.

ते म्हणतात की या कंपन्यांना शेतकऱ्यांकडून काय हवे आहे याची त्यांना चांगली जाणीव होती. मनीष म्हणतात की कंपनीच्या धोरणांविषयीही त्यांना माहिती होती, जी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने नसतात. मनीष यांनी बेटर इंडियाला सांगितले की, कॉर्पोरेट्सनी मागितलेल्या संपुर्ण भाज्यांची मागणी उत्पादक पुर्ण करू शकत नाही.

मनीषने यापूर्वीच नोकरी सोडून २००८ मध्ये शेती करण्यास सुरवात केली होती. ते म्हणतात, “मी कंपन्यांसोबत काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु यशस्वी झालो नाही.” बाजाराविषयी त्यांच्या आकलनामुळे, या दोन्ही स्तरांमधील फरक त्यांना चांगल्या प्रकारे समजला. किरकोळ विक्रेत्यांवर अवलंबून राहण्याऐवजी त्यांनी इतर शेतकर्‍यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा सल्ला दिला.

मनीष म्हणतात, एप्रिलमध्ये आम्ही आमच्या नेटवर्कद्वारे मुंबई आणि पुण्यातील अनेक निवासी सोसायट्यांपर्यंत पोहोचण्यास सुरवात केली. हळूहळू, इतर लोकांना आमच्याबद्दल माहिती होऊ लागली. आम्ही १०० निवासी सोसायटींच्या संपर्कात आलो आहोत जिथे आम्ही दर आठवड्याला कोणत्याही अडचणीशिवाय भाजीच्या बास्केट पुरवतो.

याबद्दल सविस्तर बोलताना मनीष सांगतात की चार किलोपासून ते 12 किलो पर्यंतचे बॉक्स पुरवले जातात. ते म्हणाले की, वेगवेगळ्या आकाराच्या बॉक्समध्ये आम्ही एकाच प्रमाणात भाज्या देत होतो. यानंतर, भाज्यांच्या टोपलीशिवाय आम्ही फळांची टोपली आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या भाज्यासुद्धा पुरवण्यास सुरूवात केली.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या बास्केटमध्ये बर्‍याच प्रकारच्या भाज्या होती, ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. मनीष पुढे म्हणाले की, आम्ही नंतर ग्राहकांच्या मागणीनुसार बॉक्स तयार करण्यास सुरवात केली. सध्या, कंपनी केवळ त्यांच्या एका मोबाइल अॅप्स, वेबसाइट्स आणि ग्राहक सेवा केंद्रांद्वारे ग्राहकांकडील ऑर्डर स्वीकारत आहे.

त्यांच्याकडे सध्या इंग्रजी बोलणारे कर्मचारी आहेत, जे आधी मेट्रो शहरांमध्ये कॉल सेंटरमध्ये काम करत होते. स्थानिक लोकांना भाज्या पुरवण्यासाठी त्यांनी अनेक गाड्या भाड्याने घेतल्या आहेत. श्रीकांत म्हणतात की, संकटाच्या वेळी शेतकरी आपल्या समुदायासाठी एकत्र कसे काम करतात आणि समस्येचे निराकरण करू शकतात याचे हे एक चांगले उदाहरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.